WTC Final 2023 : रोहित शर्माने 30 मिनिटातच दाखवून दिलं की कसा असेल अंदाज, पाहा Video
India vs Australia : रोहित शर्माने लंडनच्या ओव्हल मैदानात चांगलाच सराव केला. त्याचा अंदाज इतका जबरदस्त होता की, गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसून सराव करत आहे. विजयश्री खेचून आणत दहा वर्षांच्या आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची भारतीय संघाला संधी आहे. यासाठी भारतीय संघ सज्ज असून ओव्हल मैदानाचा अंदाज घेत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी कर्णधार रोहित शर्माही सज्ज आहे. रोहित शर्माने लंडनच्या ओव्हल मैदानात 30 मिनिटापर्यंत बॅटिंगचा सराव केला. या सरावात त्याचा अंदाज पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला असेल. 3 जूनला आराम केल्यानंतर भारतीय संघाने 4 जूनला सकाळी सराव केला. यावेळी बॅटिंग प्रॅक्टिससाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल नेट्समध्ये उतरले होते. मात्र शुभमन गिल सरावासाठी उशिरा पोहोचला. त्यामुळे हेड कोच राहुल द्रविडने विराट कोहलीला रोहित शर्मासोबत फलंदाजीसाठी पाठवलं होतं.
30 मिनिटांच्या प्रॅक्टिसमध्ये रोहित शर्माने काय खास केलं?
रोहित शर्माची बॅटिंग प्रॅक्टिस 30 मिनिटांपर्यंत चालली.या दरम्यात त्याचं लक्ष्य चेंडू फटकावण्यावर नव्हतं, तर चेंडू सोडण्यावर होतं. अटॅक ऐवजी डिफेंसवर लक्ष केंद्रीत करत होता. डिफेंस करताना प्रत्येक चेंडू बॅटच्या मधोमध खेळत होता. यामुळे त्याला चांगली लय सापडण्यास मदत होणार आहे.
Skipper @ImRo45 HUSTLES at the net practice, looking ever-ready to take his team to new a height in international Test cricket against #Australia!
Tune-in to #FollowTheBluesJune 7 | 9 AM & 12 PM | Star Sports Network & Disney+ Hotstar.#WTCFinalOnStar #BelieveInBlue pic.twitter.com/Snn9QcbmiG
— Star Sports (@StarSportsIndia) June 4, 2023
इंग्लंडमधील वातावरण पाहता चेंडू सोडणं ही सुद्धा एक कला आहे. इंग्लंडमध्ये चेंडू खेळण्यासोबत तो सोडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सरळ सांगायचं तर, आक्रमक फलंदाजी करताना त्यासोबत संयमही महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट रोहित शर्मा आपल्या फलंदाजीदरम्यान करत होता.
रोहित शर्माने विदेशात पहिलं शतक ठोकलं होतं ते याच ओव्हल मैदानात. रोहितनं या मैदानात 138 धावांची खेळी केली होती. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना याच मैदानात होत असल्याने रोहितचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.
Latest video of Captain Rohit Sharma's nets session.
Hitman is getting ready for WTC Final. pic.twitter.com/IzMM7HfU3f
— Vishal. (@SPORTYVISHAL) May 30, 2023
रोहित शर्माने 2023 या वर्षात एकूण 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात एका शतकासह 242 धावा केल्या आहे. यात त्याची फलंदाजी सरासरी 40 इतकी होती. विशेष म्हणजे हे चारही सामने रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.