WTC Final 2023 साठी टीम इंडियात पुन्हा बदल होणार! या खेळाडूची एन्ट्री होणार?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द ओव्हल इथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात पुन्हा बदल होणार?
मुंबई | केएल राहुल याला दुखापत झाल्याने त्याला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडावं लागंल. त्यामुळे बीसीसीआयने केएला राहुल याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन म्हणून इशान किशन याला संधी देण्यात आली. केएलच्या दुखापतीमुळे बीसीसीआयला बदली खेळाडू जाहीर करावा लागला. बीसीसीआयने यासह खबरदारी म्हणून 3 जणांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला आहे. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा टीममध्ये बदल होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की प्रकरण काय?
मी असतो तर केएल राहुल याच्या जागी यशस्वी जयस्वाल याचा समावेश केला असता. तो चांगली कामगिरी करतोय. तसेच तो येत्या काळात मोठा खेळाडू म्हणून उदयास येईल”, असं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न म्हणाला आहे. वॉर्नने याबाबत एक ट्विट केलं आहे.
यशस्वी जयस्वालबाबत काय म्हणाला मायकल वॉर्न?
I would have selected @ybj_19 as KL Rahuls replacement for the World Test championship final … He is that good .. he is going to be a superstar .. #India
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 11, 2023
आयपीएल 2023 मध्ये ‘यशस्वी’
सध्या यशस्वी आयपीएल 16 व्या मोसमात सातत्याने मोठी खेळी करत आहे. यशस्वीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 11 मे रोजी 98 धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला जिंकवलं. यशस्वीने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 575 धावा केल्या आहेत.
महामुकाबला केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.