WTC Final 2023 | केएस भरत की ईशान किशन? ऑस्ट्रेलिया विरुद्ध कुणाला संधी मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमधील द ओव्हल इथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण?

WTC Final 2023 | केएस भरत की ईशान किशन? ऑस्ट्रेलिया विरुद्ध कुणाला संधी मिळणार?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 10:45 PM

लंडन | आयपीएल 16 वा मोसम संपल्यानंतर आता टीम इंडियाचे सर्व खेळाडू टप्प्याटप्प्याने हे लंडनमध्ये दाखल झाले आहेत. टीम इंडिया लंडनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळणार आहे. टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचा तगडं आव्हान असणार आहे. मात्र या आव्हानसाठी टीम इंडिया सज्ज आहे. हा महाअंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी कॅप्टन रोहित शर्मा याच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

बीसीसीायआयने जाहीर केलेल्या टीम इंडियात विकेटकीपर म्हणून केएस भरत आणि ईशान किशन या दोघांचा समावेश आहे. आयपीएल 16 व्या मोसमात केएल राहुल याला दुखापत झाली. त्यामुळे केएल आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडला. त्यामुळे केएल राहुल याच्या जागी इशान किशन याला संधी मिळाली. मात्र आता कॅप्टन रोहित शर्मा याला विकेटकीपर म्हणून इशान आणि केएस या दोघांपैकी एकाची निवड करायची आहे.

कसोटी फॉरमेटबाबत इशान आणि केएस हे दोघेही नवखे आहेत. केएस भरत याला फक्त 4 सामन्यांचा अनुभव आहे. तर इशानचं तर अजून कसोटी पदार्पणही झालेलं नाही. त्यामुळे इशानला या सामन्यात संधी मिळाली, तर त्याचं कसोटी पदार्पण ठरेल. त्यामुळे आतादोघांपैकी कुणाला संधी द्यायची अशी डोकेदुखी टीम मॅनेजमेंटसमोर आहे.

हे सुद्धा वाचा

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...