मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या (ICC World Test Championship Final)अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसाने खराब केला. त्यामुळे खेळाडूंसह सर्वच क्रिकेटरसिक नाराज झाले. पुढील काही दिवस साऊथॅम्पटनमध्ये (Southampton) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार आजचे वातावरण खेळण्यायोग्य असले तरी इंग्लंडच्या वातावरणाचा काही नेमका अंदाज बांधता येणार नसल्याने सामना कधी सुरु होणार याबाबत साशंकता आहे. त्यात डेन्मार्क क्रिकेट फेडरेशनने थेट बीसीसीआयला (BCCI) त्यांच्या इथे वातावरण साफ असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे सामना डेन्मार्कमध्ये खेळवू शकता असे मिश्किल ट्विट केले आहे. (WTC Final In Southampton Day 1 Washout Denmark Federation offers to Host IND vs NZ match)
Meanwhile its sunny and 28° here in Copenhagen #justsaying https://t.co/tW9oTenvZe
— Danish Cricket Federation (@dcfcricket) June 18, 2021
डेन्मार्क देशाचा क्रिकेट संघ अद्याप तितका चांगला खेळ करत नसल्याने अजूनपर्यंत त्याचा संघ क्रिकेट विश्वचषकासाठीही पात्र ठरलेला नाही. डेन्मार्कचा फुटबॉल संघ ताकदवर असला तरी क्रिकेटमध्ये त्यांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.
पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे आजतरी सामना सुरु होतोका याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान कॉमेन्ट्रीसाठी तिथे उपस्थित असलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मैदानाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये मैदानावर चांगल ऊन पडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे असेच वातावरण राहिल्यास या बहुप्रतीक्षीत सामन्याला नक्की सुरुवात होईल.
पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्धा तास आधी म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु केला जाईल. तसेच पावसाने पुन्हा खोडा न घातल्यास संपूर्ण 98 ओव्हरचा खेळ खेळवला जाईल. तसेच पावासाने पुन्हा व्यत्यय आणल्यास 60 ते 70 ओव्हरचा खेळही खेळवला जाऊ शकतो. मात्र इंग्लडच्या हवामानाबाबत कोणतीही पुष्टी केली जाऊ शकत नसल्याने वातावरण कधीही बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. जी काही परिस्थिती आहे ती पुढील काही तासांतच स्पष्ट होईल.
हे ही वाचा :
Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ
WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?
(WTC Final In Southampton Day 1 Washout Denmark Federation offers to Host IND vs NZ match)