WTC Final 2023 | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात कोण वरचढ? पाहा Head To Head Record

Wtc Final 2023 Ind vs AUS Head To Head Record | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना रंगणार आहे.जाणून घ्या आकड्यांच्या बाबतीत कोणता संघ वरचढ आहे.

WTC Final 2023 | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात कोण वरचढ? पाहा Head To Head Record
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 4:15 PM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 महाअंतिम सामन्याला आता मोजून 24 तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. या महामुकाबल्यात चांदीच्या गदेसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघांनी गेल्या 2 वर्षात दिग्गज संघांना पछाडत फायनलमध्ये धडक मारली. मात्र या दोन्ही संघांचे एकमेकांसमोरची कामगिरी कशी आहे, हे आपण हेड टु हेड रेकॉर्ड्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

आकडे काय सांगतात? ind vs aus head to head test stats

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 106 सामन्यांपैकी 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 32 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांना 29 सामने ड्रॉ करण्यात यश आले आहे. तर 1 सामना हा टाय झालाय.

ऑस्ट्रेलियाने या 44 पैकी 30 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर 14 सामने ऑस्ट्रेलियाबाहेर जिंकले आहेत. तर भारताने 23 देशात आणि 9 परदेशात सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ आहे.

हे सुद्धा वाचा

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.