WTC FINAL 2023 | शार्दुल ठाकूर पण दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर?
केएल राहुल याला दुखापतीमुळे एकाच वेळी आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यानंतर आता शार्दुल ठाकूर याने दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या महामुकाबल्यात मानाच्या गदेसाठी भिडणार आहेत. हा हायव्होल्टेज सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाची घोषणाही केली आहे. मात्र या निर्णायक सामन्याआधी केएल राहुल याला आयपीएल दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे केएल राहुल याला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी टीममध्ये इशान किशन याचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने 8 मे रोजी याची घोषणा केली. तसेच सोबत राखीव म्हणून 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूर याचाही मुख्य संघात समावेश आहे. शार्दुल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतोय. मात्र शार्दुलला गेल्या काही सामन्यांपासून बॉलिंगची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे शार्दुलला दुखापत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली मात्र. शार्दुलने आपल्या दुखापत आहे की नाही, त्याला बॉलिंग करायला का मिळत नाही, याबाबत माहिती दिली आहे.
शार्दुल ठाकूर काय म्हणाला?
शार्दुलने आपल्या चाहत्यांना असेलली चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केकेआर टीममध्ये एकसेएक ऑलराउंडर्स असल्याने माझ्यावर बॉलिंग करण्याची वेळ येत नाहीये. तसेच मला कोणतीही दुखापतही नाही, असं शार्दुलने सांगितलंय. “आमच्या टीममध्ये आंद्रे रसेल, सुनील नारायणसह अनेक ऑलारउंर्स आहेत. आमच्याकडे बॉलिंगसाठी जवळपास 8 पर्याय आहेत. यामध्ये कॅप्टन नितीश राणा याचाही समावेश आहे. नितीशही 1-2 ओव्हर टाकतो”, असं शार्दुलने स्पष्ट करतो.
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 8 मे रोजी केकेआरने 7 गोलंदाजांना बॉलिंगची संधी दिली. टीममधील अनेक युवा खेळाडूंना बॉलिंगची संघी दिली. “मला साधारण दुखापत झाली त्यामुळे मी काही सामन्यात खेळलो नाही. मी जेव्हा कमबॅक केलं तेव्हा बॉलिंग टाकण्यासाठी फिट नव्हतो. पण मी आता बॉलिंगसाठी सज्ज आहे. तसेच जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मी चांगली कामगिरी करेन”, असा विश्वास शार्दुलने यावेळेस व्यक्त केला.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.