IND vs NZ : यशस्वीचा पुण्यात न्यूझीलंड विरुद्ध आणखी एक रेकॉर्ड, सेहवाग आणि रोहितला पछाडलं

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल याने टीम इंडियाला 359 धावांचा पाठलाग करताना स्फोटक सुरुवात करुन दिली. यशस्वीने या दरम्यान मोठा रेकॉर्ड उद्धवस्त केला आणि रोहित शर्मा-वींरेंद्र सेहवाग या दोघांना मागे टाकलं.

IND vs NZ : यशस्वीचा पुण्यात न्यूझीलंड विरुद्ध आणखी एक रेकॉर्ड, सेहवाग आणि रोहितला पछाडलं
yashasvi jaiswal ind vs nzImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 1:49 PM

न्यूझीलंड विरुद्ध पहिली कसोटी गमावल्याने टीम इंडियासाठी मालिकेतील दुसरा सामना हा निर्णायक आणि ‘करो या मरो’ असा आहे. न्यूझीलंडने पुण्यात खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताला विजयासाठी 359 धावांचं दिलंय. न्यूझीलंडने पहिल्या डावातील 103 धावांच्या मदतीने दुसऱ्या डावात 255 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताला हे 359चं आव्हान मिळालं. भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. रोहित आणि यशस्वीने 34 धावांची सलामी भागीदारी केली. रोहितला दुसऱ्या डावातही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. रोहित 8 धावा करुन आऊट झाला. मात्र यशस्वीने या दरम्यान एक मोठा कारनामा केला.

यशस्वी मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला भारतीय फंलदाज ठरला. यशस्वीने दुसर्‍या डावातील 5 व्या ओव्हरमधील दुसर्‍या बॉलवर 1 धाव घेत ही कामगिरी केली. यशस्वीने यासह टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्मा या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला. यशस्वीने सेहवाग आणि रोहितच्या तुलनेत फार कमी चेंडूत या 1 हजार धावा केल्यात.

भारतात वेगवान 1 हजार धावा आणि चेंडू

यशस्वी जयस्वाल : 1315 बॉल

वीरेंद्र सेहवाग : 1436 बॉल

रोहित शर्मा : 1506 बॉल

दरम्यान यशस्वी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करुन दिल्यानंतर आऊट झाला. यशस्वी झंझावाती अर्धशतक ठोकल्यानंतर आणखी आक्रमक झाला होता. त्याला शतक करण्याची संधी होती. मात्र मिचेल सँटनर याने यशस्वीला डॅरेल मिचेल याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 65 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने 77 धावांची शानदार खेळी केली.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.