यशस्वी जयस्वाल या वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू, कोहली आणि कार्तिकच्या विक्रमाची बरोबरी

भारताने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे 30 जुलै रोजी होणारा शेवटचा सामना फक्त औपचारिक असेल. दुसऱ्या टी20 सामन्यात यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली. तसेच एका विक्रमाची नोंद केली आहे.

यशस्वी जयस्वाल या वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू, कोहली आणि कार्तिकच्या विक्रमाची बरोबरी
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 1:11 AM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेने 20 षटकात 9 गडी गमवून 161 धावा केल्या आणि विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं. भारताचा डाव सुरु झाला आणि तीन चेंडूनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना सुरु होण्यासाठी वेळ लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचं टार्गेट बदलण्यात आलं. भारताला 8 षटकात 78 धावा करण्याचं आव्हान देण्यात आलं. भारताने हे आव्हान 6.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. यात यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी केली. 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. या धावांसह यशस्वी जयस्वालने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2024 या वर्षात 1000 धावा पूर्ण करणार जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच एका वर्षात 1000 धावा करणारा तरुण फलंदाजही ठरला आहे. त्याने विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी 22 व्या वर्षी अशी कामगिरी केली होती. कोहलीने 2010 साली आणि दिनेश कार्तिकने 2007 साली या विक्रम नोंदवला होता. आता 22 व्या वर्षी यशस्वी जयस्वालने ही कामगिरी केली आहे. पण या विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने 1992 मध्ये 19 वर्षांचा असताना एका वर्षात 1000 धाव केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने 19 व्या वर्षी, रवि शास्त्रीने 21 व्या वर्षी, विनोद कांबळीने 21 व्या वर्षी, सचिन तेंडुलकरने 21 व्या वर्षी, दिनेश कार्तिकने 22 व्या वर्षी, विराट कोहलीने 22 व्या वर्षी आणि यशस्वी जयस्वालने 22 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.

लोकसभेत पकंजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पकंजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका.
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन.