IND vs ENG | 6,4,4,6, यशस्वी जयस्वालचा तडाखा, इंग्लंड विरुद्ध वादळी अर्धशतक
Yashasvi Jaiswal Fifty | यशस्वी जयस्वाल याने टॉप गिअर टाकत इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच पद्धतीने बेझबॉल स्टाईल अर्धशतक झळकावलं आहे. यशस्वीने या अर्धशतकादरम्यान जोरदार फटकेबाजी केली.
राजकोट | टीम इंडियाचा युवा सलामीवीर आणि मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यशस्वीने 80 बॉलमध्ये सिक्ससह हे बेझबॉल स्टाईल अर्धशतक झळकावलं. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. यशस्वीने संथ खेळी सुरुवात केली मात्र त्यानंतर त्याने टॉप गिअर टाकला. यशस्वीने त्यानंतर मोठे फटके मारत दणक्यात अर्धशतक पूर्ण केलं.
इंग्लंडचा पहिला डाव हा टीम इंडियाच्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात 319 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला 126 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने दुसऱ्या डावाला 126 धावांच्या आघाडीसह सुरुवात केली. यशस्वी आणि कॅप्टन रोहित शर्मा सलामी जोडी मैदानात आली. रोहितला पहिल्या डावात शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या डावात तसंच सातत्य ठेवता आलं नाही. रोहित 19 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 30 बाद 1 असा झाला. रोहितनंतर शुबमन गिल मैदानात आला.
यशस्वी आणि शुबमन या दोघांनी डाव सावरला. शुबमनने यशस्वीला बहुतांश वेळेस स्ट्राईक दिली. यशस्वी याचा फायदा घेतला. यशस्वीने सावकाश सुरुवात केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला. यशस्वीने दांडपट्टा सुरु केला आणि सिक्ससह अर्धशतक केलं. यशस्वीने या अर्धशतकी खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. यशस्वीने 68.75 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं.
दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
दरम्यान यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली आहे. शुबमनने दिलेल्या स्ट्राईकचा फायदा घेत यशस्वीने फटकेबजी केली. त्या जोरावर या दोघांमध्ये 100 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीत शुबमनचं धावांचं योगदान कमी जरी असलं तरी त्याची भूमिका ही मोलाची ठरली.
यशस्वीचं सिक्ससह अर्धशतक पूर्ण
6⃣ x 2 🔥
Yashasvi Jaiswal is dealing in maximums at the moment in Rajkot 🙌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/JtEbJETcAz
— BCCI (@BCCI) February 17, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.