Video : ऑस्ट्रेलियात यशस्वी जयस्वालची झाली गोची! शुबमन गिल आणि रोहित शर्माने घेतली फिरकी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील डे नाईट सामना 6 डिसेंबरला होणार आहे. पण या सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत यशस्वी जयस्वालची गोची झाल्याचं दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सामना एडिलेडमध्ये होणार आहे. भारतीय संघ एडिलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हनविरुद्ध पिंक बॉल सामना खेळला. यात भारताने मजबूत तयारी कल्याचं दिसून आलं आहे. कॅनबरा येथे झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर इलेव्हनला पराभूत केलं. आता टीम इंडिया इडिलेडसाठी रवाना झाली आहे. एडिलेडच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्यांदा सामना होणार आहे. दरम्यान, कॅनबरा ते एडिलेडच्या प्रवासातील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत भारताची युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल रिस्ट्रिक्टेड भागात अडकल्याचं दिसत आहे. पर्थ कसोटीत दीड शतकी खेळी करून भारताला विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या यशस्वी जयस्वालची फजिती झाली. एअरपोर्टवरील रिस्ट्रिक्टेड भागात अडकला. मदतीसाठी यशस्वी जयस्वाल कावराबावरा झाला होता. पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याची मदत करण्याऐवजी त्याची फिरकी घेतली. मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.
बीसीसीआयने एक्स खात्यावरून शेअर केलेल्या व्हिडीओत भारताचा प्रवास आहे. या व्हिडीओत यशस्वी जयस्वाल भारतीय संघातसोबत आहे. पण सुरुवातीलाच जयस्वाल रिस्ट्रिक्टेड भागात अडकल्याचं दिसला. तसेच काही काळ त्याला सूचेनासं झालं होतं. व्हिडीओत, कर्णधार रोहित शर्मा सांगतो की, तो तिथे अडकला आहे. त्यानंतर गिल सांगतो की तिथे लिहिलं आहे की, येथे येऊ नका. मग गिल हसत सांगतो की, जर आपण दरवाज्याजवळ गेलो तर उघडेल तो..
Banter check ✅
Hat check ✅
Travel day ✅#TeamIndia have arrived in Adelaide 👌 👌#AUSvIND pic.twitter.com/hRDUfOTcpf
— BCCI (@BCCI) December 3, 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया एडिलेडवर दुसऱ्यांदा कसोटी सामना खेळणार आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 8 गडी राखून मात दिली होती. पण भारताने मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे एडिलेडचा इतिहास बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल चमकला होता. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर, दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली होती.