IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या शतकासह यशस्वीची थेट सचिनच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याने 151 बॉलमध्ये कसोटी कारकीर्दीतील दुसरं शतक झळकावलं. यशस्वीने या शतकी खेळीत 3 सिक्स आणि 11 फोर लगावले.

IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या शतकासह यशस्वीची थेट सचिनच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 2:55 PM

विशाखापट्टणम | टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध वीरेंद्र सेहवाग स्टाईलने सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे दुसरं आणि भारतातील पहिलं अर्धशतक ठरलं. यशस्वीने यासह खास पंक्तीत स्थान मिळवलं आहे. यशस्वी थेट सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये जाऊन बसला आहे.

वयाच्या 22 व्या वर्षात यशस्वी जयस्वाल मायदेशात आणि परदेशात शतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.या यादीत सचिन तेंडुलकर याच्यासह रवी शास्त्री या दोघांचा समावेश आहे. यशस्वीने या शतकासह बरेच रेकॉर्ड केले आहेत. यशस्वीने आणखी काय काय विक्रम केले आहेत, ते जाणून घेऊयात. यशस्वी वयाच्या 22 वर्षी सर्वाधिक शतकं करणारा टीम इंडियाचा दुसरा ओपनर ठरलाय. यशस्वीचं इंग्लंड विरुद्ध ओपनर म्हणून 2 शतक ठरलं आहे. यशस्वीच्या आधी लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी वयाच्या 22 वर्षात 4 शतकं ठोकली होती.

दरम्यान यशस्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीत सर्वाधिक शतकं करणारा बॅट्समन ठरलाय. यशस्वीच्या नावावर 2 शतकांची नोंद आहे. तर या टॉप 5 मध्ये यशस्वीसह विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथ हे दोघे आहेत.

यशस्वी जयस्वाल अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.