Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याचा डबल धमाका, इंग्लंड विरुद्ध दुसरं द्विशतक

Yashasvi Jaiswal Double Century | यशस्वी जयस्वाल याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्ध दुसरं द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे.

Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याचा डबल धमाका, इंग्लंड विरुद्ध दुसरं द्विशतक
यशस्वीने आता अवघ्या 7 डावांमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने 600 पेक्षा अधिक धावा करत विराटला मागे टाकलं आहे.
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 2:34 PM

राजकोट | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी तडाखेदार द्विशतक ठोकलं आहे. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं हे दुसरं द्विशतक ठरलं आहे. यशस्वीने हे दोन्ही द्विशतकं इंग्लंड विरुद्धच्या याच कसोटी मालिकेत झळकावली आहेत. यशस्वीने या द्विशतकी खेळीत मैदानात चौफेर फटेकबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

यशस्वी जयस्वाल याने खेळीत 10 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 86.58 च्या स्ट्राईक रेटने हे द्विशतक केलं. यशस्वीने त्याआधी इंग्लंड विरुद्ध हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक केलं होतं. यशस्वी फिफ्टी ते डबल सेंच्युरीपर्यंतचा पल्ला वेगाने गाठला. यशस्वीने 80 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 122 चेंडूत शतक पूर्ण केलं. अर्थात यशस्वीला अर्धशतकानंतर शतकापर्यंत पोहचण्यासाठी 42 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर यशस्वीने 192 बॉलमध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडला. तर त्यानंतर आता 231 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं.

हे सुद्धा वाचा

दरम्यान यशस्वी जयस्वाल तिसऱ्या दिवशी शतकानंतर मैदानाबाहेर केला. यशस्वीला त्रास जाणवत असल्याने तो 104 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. त्यानंतर यशस्वी चौथ्या दिवशी शुबमन गिल 91 धावांवर आऊट झाला. गिल माघारी गेल्यानंतर यशस्वी मदैानात आला आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. यशस्वीने जबाबदारी सार्थपणे पार पाडत द्विशतक पूर्ण केलं.

टीम इंडियासाठी ‘यशस्वी’ द्विशतक

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.