IND vs ENG | यशस्वीचं सलग दुसरं अर्धशतक, इंग्लंड विरुद्ध शानदार सुरुवात

Yashasvi Jaiswal Fifty | यशस्वी जयस्वाल इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करतोय. यशस्वीने इंग्लंड विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे.

IND vs ENG | यशस्वीचं सलग दुसरं अर्धशतक, इंग्लंड विरुद्ध शानदार सुरुवात
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 12:08 PM

विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले. केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या तिघांच्या जागी रजत पाटीदार, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार या तिघांना संधी देण्यात आली. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही मुंबईकर जोडी ओपनिंगला आली. टीम इंडियाने संयमी सुरुवात करत 40 धावा जोडल्या. मात्र ज्याची भीती तेच झालं. रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. रोहित 14 धावा करुन आऊट झाला.

रोहितनंतर शुबमन गिल मैदानात आला. शुबमनने आक्रमक सुरुवात करुन इंग्लंड विरुद्ध त्यांच्यांच पद्धतीने फटकेबाजीला सुरुवात केली. त्याला चांगली सुरुवातही मिळाली. मात्र त्याला आऊट व्हायची घाई होती. अखेर तो आऊट झाला. शुबमनने 46 बॉलमध्ये 34 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 89 अशी स्थितीत झाली. एका बाजूला टीम इंडियाने 2 विकेट्स गमावल्या. तर दुसऱ्या बाजूला यशस्वी एक बाजू धरुन होता. शुबमन आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला.

श्रेयससोबत यशस्वीने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान यशस्वीने इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं आणि इंग्लंड विरुद्धचं सलग दुसरं अर्धशतक ठरलं. यशस्वीने 89 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने ही फिफ्टी केली. विशेष म्हणजे यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतही पहिल्याच दिवशी अर्धशतक झळकावलं होतं.

यशस्वीचं भारतातील आणि इंग्लंड विरुद्धचं सलग दुसरं अर्धशतक

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत 31 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 103 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 51 आणि श्रेयस अय्यर 4 धावांवर नाबाद आहेत. पहिलं सत्र हे इंग्लंड आणि टीम इंडिया दोघांच्या नावावर फिफ्टी फिफ्टी असं राहिलं. आता दुसरं सत्र कोण आपल्या नावावर करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांतं लक्ष असणार आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (डब्ल्यू), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.