मेलबर्न कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल स्टार्कचा मारा परतवून लावणार! नेट्समध्ये केला असा सराव
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका तीन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. हा सामना मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष आहे. असं असताना पहिल्या सामन्यात हिरो ठरलेला यशस्वी जयस्वालकडून फार अपेक्षा आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने चमकदार कामगिरी केली होती. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतकी खेळी करत विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. इतकंच काय तर पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने मिचेल स्टार्कला डिवचलं होतं. तुझा चेंडू खूपच स्लो येत असल्याचं यशस्वी जयस्वाल सहज म्हणून गेला होता. मात्र त्याचा फटका त्याला पुढच्या दोन सामन्यांमध्ये बसला. मिचेल स्टार्कने संपूर्ण राग या सामन्यात काढला आणि त्याची विकेट घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात अशीच स्थिती होईल की अशी भीती क्रीडाप्रेमींना सतावत आहे. पण भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिचेल स्टार्कचा सामना करण्यासाठी यशस्वी जयस्वालने खास सराव केला. मिचेल स्टार्कला चौथ्या कसोटी सामन्यात कोणतीच संधी देऊ इच्छित नाही. जयस्वालच्या सरावाबाबत मीडियात एक माहिती समोर आली आहे.
मेलबर्न कसोटी सामन्यासाठीचं सराव शिबीर संपल्यानंतर यशस्वी जयस्वालने खास सेशन केलं. या सेशनमध्ये डावखुऱ्या थ्रो डाऊनचा अभ्यास केला. मिचेल स्टार्क हा डावखुरा गोलंदा आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, स्टार्कचा सामना करण्यासाठी जयस्वालने खास अभ्यास केला आहे. त्यामुळे आता यशस्वी जयस्वाल चौथ्या कसोटी कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. ब्रिस्बेन कसोटी यशस्वी जयस्वाल 4 धावा करून बाद झाला होता. एडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात स्टार्कने त्याला गोल्डन डकवर पाठवलं होतं
रोहित शर्माने जयस्वालची पाठराखण करत सांगितलं की, ‘जयस्वाल पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं आहे की तो काय करू शकतो. खूपच प्रतिभावंत खेळाडू आहे. जर तुमच्याकडे त्याच्यासारखा खेळाडू आहे तर त्याच्या मानसिकेतेत काही बदल करण्याची आवश्यकता नाही. जितकं शक्य तितकं निर्भिडपणे खेळू दे. त्याच्या फलंदाजीबाबत अधिक विचारविनिमय करून त्याच्या अतिरिक्त दबाव टाकू इच्छित नाही. इतर तुलनेत त्याला त्याच्या फलंदाजीबाबत माहिती आहे. त्याने आतापर्यंत असंच क्रिकेट खेळलं आहे.’