बुमराहने गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालला नाचवलं, विराट कोहली मदतीसाठी धावला

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. यासाठी भारतीय संघ चांगलाच घाम गाळत आहे. नेटमध्ये सराव करताना ओपनर यशस्वी जयस्वाल मात्र वेगळ्याच अडचणीत दिसला. त्याला होत असलेला त्रास पाहून विराट कोहली मदतीला धावला.

बुमराहने गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालला नाचवलं, विराट कोहली मदतीसाठी धावला
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 10:00 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन दिवसांनी पहिला कसोटा सामना सुरु होईल. या सामन्यासाठी संघात निवडलेले सर्व खेळाडू सराव करत आहे. या सरावात यशस्वी जयस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. कारण सरावातही त्याला लय सापडताना दिसली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. सोमवारी झालेल्या सराव शिबिरात जसप्रीत बुमराहने यशस्वी जयस्वालला सळो की पळो करून सोडलं. रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहच नाही इतर गोलंदाजानीही त्याला अडचणीत आणलं. त्याची अडचण पाहून विराट कोहली मदतीसाठी पुढे सरसावला. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह आणि इतर वेगवान गोलंदाजांनी यशस्वी जयस्वाल सोबत नेट प्रॅक्टिस केली. सराव लाल मातीच्या विकेटवर सुरु होता. ही खेळपट्टी खासकरून वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्याचा पुरेपूर फायदा बुमराहने घेतला. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालची फलंदाजी करताना चांगलीच दमछाक झाली. बुमराहने ऑफ स्टंपबाहेर चेंडू टाकत त्याला चकवा देत होता. तसेच दोनदा त्रिफळा उडवला. इतकंच काय तर सिमरजीत सिंह, गुरनूर बराड आणि गुरजनप्रीत सिंहने जयस्वालला चकवलं.

विराट कोहली बाजूच्याच नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. त्याची नजर यशस्वीच्या फलंदाजीकडे जात होती. यशस्वी जयस्वालची अडचण पाहून विराट कोहलीने लगेचच त्याच्याशी बोलला. नेमकं काय चुकतंय ते सांगितलं. आता विराट कोहलीचा सल्ला यशस्वीच्या किती कामी येतो हे लवकरच दिसेल.खरं सांगायचं तर यशस्वी जयस्वालकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.  त्याची विकेट बांगलादेशला लवकर मिळाली तर अडचणीचं ठरू शकतं. कारण एकदा बांगलादेशला पिक मिळाला तर त्याचा फायदा घेऊ शकतात.

विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालने एक तास बॅटिंगचा सराव केला. दोघेही जवळपास 50 चेंडू खेळले. यात जमेची बाजू म्हणजे यशस्वी जयस्वालने फिरकीपटूंचा जबरदस्त सामना केला. ऑफ साइडला चांगली फटकेबाजी केली. यशस्वी जयस्वालचा फॉर्म परत आला तर टीम इंडियाला पुढच्या सर्वच सामन्यातील टेन्शन निघून जाईल. दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळला होता. पण तिथेही काही खास करू शकला नाही. इंडिया बी संघासाठी त्याने पहिल्या डावात 30 आणि दुसऱ्या डावात 9 धावा केल्या.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.