YiPPee! Toss : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान द्रविड, बुमराह आणि सूर्यकुमारची क्रिप्टीक पोस्ट, नेमकं काय झालं? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. आयर्लंडनंतर भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पण या स्पर्धेदरम्यान राहुल द्रविड, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांची क्रिप्टीक पोस्ट चर्चेत राहिली. क्रीडारसिकांना त्या मागचा नेमका अर्थ कळला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ लावत होता. आता या पोस्टचा अर्थ उघड झाला आहे.

YiPPee! Toss : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान द्रविड, बुमराह आणि सूर्यकुमारची क्रिप्टीक पोस्ट, नेमकं काय झालं? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 12:15 PM

वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रतिस्पर्धी संघांना घाम फोडणारा सूर्यकुमार यादव हे त्यांच्या क्रिप्टीक पोस्टमुळे चर्चेत आले होते. इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याने ‘The Toss’ इतकंच लिहिलं होतं. त्यामुळे तिघांनी एकसारख्याच पोस्ट लिहिल्याने क्रीडारसिकांमध्ये कुतुहूल वाढलं होतं. खेळाडूंच्या पत्नीनीही या पोस्टचा कित्ता गिरवल्याने चर्चेचा विषय ठरला होता. नेमकं काय घडलं याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अनेकांनी दिग्गज क्रिकेटपटूंच्या पोस्टखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. या पोस्टचा नेमका अर्थ काय? असे एक ना अनेक प्रश्न विचारले. बघता बघता त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्या. क्रिकेटपटूंना या क्रिप्टीक पोस्टच्या माध्यमातून नेमकं काय सांगायचं आहे हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर यावरून पडदा दूर झाला असून ती पोस्ट सनफीस्ट YiPPee ब्रँडबाबत सांगत होते. कंपनीच्या नव्या ‘YiPPee Toss’ या मोहिमेचा उलगडा झाला असून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.

सनफीस्ट YiPPee!, आयटीसी लिमिटेड ही झटपट नूडल्स आणि पास्ता ब्रँड बनवणारी एक अग्रगण्य कंपनी आहे.कंपनीच्या या मोहिमेत राहुल द्रविड, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांनीही भाग घेतला. लोकप्रिय खेळाडूंनी या अद्वितीय गुण असलेल्या YiPPeeचं कौतुक केलं. याची खासियत म्हणजे हे नूडल्स लांबलचक आणि नॉन स्टिकी असून अधिक चवदार आहेत.

Fans_Reaction

कंपनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यात टीम बसच्या विंडो सीटवर बसण्यावरून वाद होतो. तेव्हा तिथे बसलेला राहुल द्रविड त्यांना YiPPee Toss बाबत सांगतो. त्यानंतर ते दोघेही YiPPee नूडल्स निर्णयासाठी समोर ठेवतात. मात्र नूडल्स लांबलचक आणि नॉन स्टिकी असल्याने घसरतात. त्यामुळे राहुल द्रविडला निर्णय घेणं कठीण होतं.

कविता चतुर्वेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी (स्नॅक्स नूडल्स आणि पास्ता, फूड बिझनेस, ITC लिमिटेड) म्हणाल्या, “क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. खेळासोबत आपल्या ग्राहकांशी जोडण्याचा उत्तम मार्ग आहे. YiPPee नूडल्स चविष्ट तर आहेच, पण या मोहिमेतून आमच्या ब्रँडची खेळकर उर्जा आणि YiPPee चा आस्वाद घेण्याचा आनंद देणार आहे. मित्र आणि कुटुंबासह याचा आनंद खूपच वेगळा असेल.”

जसप्रीत बुमराह याने सांगितलं की, “ही एक अतिशय खेळकर मोहीम आहे आणि आम्ही खूप मजा केली. भांडण सोडवण्याचा एक मार्ग असेल तर तो YiPPee द्वारेच!”. त्याचीच री ओढत सूर्यकुमार यादव म्हणाला की, “या मोहिमेचा भाग होण्यासाठी मी उत्साहित आहे. कारण मैदानावर आणि मैदानाबाहेर आमच्या मैत्रीचं उत्तम प्रतिबिंब आहे. YiPPee मुळे आमची खेळकर भांडणे सोडवणे खूप सोपे झाले आहे.”

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, “या मोहिमेत बुमराह आणि स्कायसोबत काम करताना मला खूप मजा आली. आम्ही काहीतरी मजेशीर तयार केले आहे आणि मला आशा आहे की सर्वांना ते आवडेल.”

YiPPee! Toss, ही मोहीम देशभरातील अनेक मीडिया प्लॅटफॉर्मवर आणली जाईल. ब्रँडला खात्री आहे की, ही मोहीम ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल. तसेच स्वादिष्ट नूडल्सची अनुभूती देईल.आवडत्या क्रिकेटपटूंमधील वाद YiPPee ने सोडवला आहे. या स्टार्सप्रमाणेच तुम्ही मित्रांमधील खेळकर वाद मिटवण्यासाठी टॉस नक्कीच करा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.