World Cup टीममध्ये ‘या’ खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, ‘तो संघात हवा होता’!
माजी खेळाडू युवराज सिंहने निवड समितीवर ताशेरे ओढताना दोन खेळाडूंची नाव घेत त्यांना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं सांगतिलं आहे. युवराज सिंह याच्या मते त्यातील एका खेळाडूला संघात जागा द्यायला हवी होती.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी निवडलेल्या संघावर भारताचा स्टार आणि माजी खेळाडू युवराज सिंह याने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघामध्ये एका खेळाडूला संधी न दिल्यामुळे युवराजने त्याचं जाहीरपणे नाव घेतलं आहे. निवड समितीवर ताशेरे ओढताना युवराजने एक नाहीतर दोन खेळाडूंना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवराज सिंह याच्या मते संघामध्ये त्या खेळाडूंना जागा द्यायला हवी होती.
कोण आहेत ते खेळाडू?
भारतीय संघाचा स्टार ऑल राऊंडर अक्षर पटेल दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात आर. अश्विन याला घेण्यात आलं. मात्र निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर युवराज सिंह काही खूश दिसला नाही. युवराज सिंहच्या मते अक्षर जखमी झाला तर त्याच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी मिळायला हवी होती नाहीतर वॉशिंग्टन सुंदरला संघात घ्यायला हवं होतं. मात्र निवड समितीने अश्विनला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवून दिलं.
काय म्हणाला युवराज सिंह?
माझं वैयक्तित मत आहे की, संघात युजवेंद्र चहल याची गरज आहे कारण लेग स्पिनरची कमी तो भरून काढेल. बर तुम्ही युझीची निवड नाही केलीत तर त्या जागी मी अश्विनला पाहण्यास उत्सुक होतो. बहुतेक संघाला एक अनुभवी स्पिनर हवा होता त्यामुळे आर अश्निन याची वर्ल्ड कप संघात निवड केली असू शकते, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. यावेळी बोलताना युवराज सिंहने जसप्रीत बुमराहबाबतही वक्तव्य केलं आहे.
2011 साली भारताकडे झहीर खान होतो तसा आता संघात जसप्रीत बुमराहसारखा मॅचनविनर आहे. बमुराहसारख्या बॉलरमुळे संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. दुखापत झाल्यावर कमबॅक करणं अवघड असतं मात्र जसप्रीतने दमदार कमबॅक केल्याचं युवराज सिंह म्हणाला.
भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ :-
भारत : रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.