Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युझवेंद्र चहलचा संसार मोडला, भारताच्या 11 खेळाडूंसोबत असंच झालं होतं; जाणून घ्या

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात अखेर काडीमोड झाला आहे. मुंबईच्या फॅमिली कोर्टने दोघांच्या घटस्फोट अर्जाला मंजुरी दिली आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्यानंतर आता चहलचा घटस्फोट झाला आहे. पण या क्रिकेटपटूंसह 11 खेळाडूंचा असाच संसार मोडला आहे. चला जाणून घेऊयात एका क्लिकवर

युझवेंद्र चहलचा संसार मोडला, भारताच्या 11 खेळाडूंसोबत असंच झालं होतं; जाणून घ्या
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 5:48 PM

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली होती. मात्र दोन्ही बाजूने अधिकृत असं काहीच समोर आलं नव्हतं. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. मात्र गेल्या दोन वर्षांपासून दोघंही वेगळे राहात होते. अखेर कोर्टाकडून दोघांमधील नातं संपुष्टात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईच्या फॅमिली कोर्टाने या दोघांना वेगळं होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तबक केलं आहे. युझवेंद्र चहलच्या आधी हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांचा घटस्फोट झाला होता. या खेळाडूंसह एकूण 11 क्रिकेटपटूंचा असाच घटस्फोट झाला आहे. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत सविस्तर

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न 2020 मध्ये झालं होतं. दोन वर्षे त्यांचा संसार व्यवस्थित चालला. मात्र त्यानंतर त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडला आणि वेगवेगळे राहू लागले. अखेर मार्च 2025 मध्ये त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. चहलन धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी देणार आहे.

हार्दिक पांड्या आणि सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक यांची गाठ 2020 मध्ये बांधली गेली. तेव्हा त्यांनी साखरपुड्याची घोषणा केली होती. त्याच वर्षी त्यांच्या घरी अगस्त्य जन्माला आला. पण त्यानंतर दोघात काहीतरी बिनसलं आणि मागच्या वर्षी घटस्फोट झाला.

शिखर धवन आणि मेलबर्नची किकबॉक्सर आयेशा मुखर्जी यांचं प्रेमप्रकरणही गाजलं होतं. दोन मुलांची आई आणि घटस्फोटीत असताना शिखर धवनने आयशासोबत लग्न केलं. जवळपास या दोघांचा संसार एक दशक चालला. तसेच दोघांना एक मुलगा आहे. 2021 मध्ये दोघंही वेगळे झाले, वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं प्रकरणही खूप गाजलं. जहाँने शमीवर विवाहबाह्य संबंध आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. शमीने हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. दोघे वेगळे झाले असले तरी आरोपप्रत्यारोपाच्या फैरी अजूनही झडतात.

दिनेश कार्तिकचं पहिले लग्न निकिता वंजारासोबत झाले होते. दोघेही बालपणीचे मित्र होते आणि 2007 मध्ये त्यांचे लग्न झाले. कार्तिकचा मित्र मुरली विजयसोबत निकिताचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवांनंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. 2012 मध्ये घटस्फोटानंतर निकिताने मुरली विजयशी लग्न केले.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचाही घटस्फोट झाला आहे. त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत होतं. त्यांचं पहिलं लग्न हे शबनम सिंगशी झालं होतं. ही युवराज सिंगची आई आहे. त्यानंतर योगराज सिंगने पंजाबी अभिनेत्री सतवीर कौरसोबत लग्न केलं.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याचं लग्न 1999 मध्ये ज्योत्सनासोबत झालं होतं. जवळपास एक वर्षे संसार थाटल्यानंतर 2008 मध्ये वेगळे झाले. रिपोर्टनुसार, या दोघांमध्ये मतभेद होते. श्रीनाथने 2013 मध्ये माधवी पत्रवालीसोबत दुसरा विवाह केला.

विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने चर्चेत आहे. पण विनोद कांबळी घटस्फोटामुळेही चर्चेत आला होता. त्याचं पहिलं लग्न हे रिसेप्शनिस्ट नोएला लुईससोबत झालं होतं. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले. त्यानंतर विनोद कांबळीने अँड्रिया हेविटसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगाही आहे.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याचाही घटस्फोट झाला आहे. त्याचं पहिलं लग्न 1987 मध्ये नौरीनसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. त्यानंतर 1996 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीच्या प्रेमात पडला आणि पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला. दुसरं लग्नाचा शेवटही घटस्फोटाने झाला आहे.

रवी शास्त्री आणि रितू सिंग यांचाही घटस्फोट झाला आहे. या दोघांचं लग्न दोन दशके टिकले, पण 2012 मध्ये नातं संपुष्टात आलं. शास्त्री यांच्या प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून व्यस्त वेळापत्रकामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असे म्हटले जाते. पण माजी क्रिकेटपटूने या प्रकरणावर मौन बाळगले आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.

मनोज प्रभाकर याचे पहिले लग्न संध्यासोबत झाले होते. त्यानंतर या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि घटस्फोट झाला. त्यानंतर या माजी क्रिकेटपटूने अभिनेत्री फरहीनशी लग्न केले.

मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.