मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर (Leg spinner) युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra chahal) खासगी जीवनावरुन सध्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मावरुन (Dhanshree verma) गुरुवारी बरेच अंदाज वर्तवले गेले. त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलय असंच सगळ्यांना वाटलं. कारण धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरील युजरनेम मधून चहल आडनाव हटवलं. अफवाचा बाजार गरम होत असतानाच, आता युजवेंद्र चहलने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं चाहत्यांना आवाहन केलं आहे. चहल आणि धनश्रीच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्टनंतर त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला. दोघांनी वेगवेगळा मार्ग पकडलाय, असा सोशल मीडियाचा सूर होता.
युजवेंद्र चहलने गुरुवारी 18 ऑगस्टला इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली. यात त्याच्या आणि धनश्रीच्या नात्याबद्दल अफवा उडवल्या जात असल्याचं त्याने म्हटलं. तुम्हाला सर्वांना नम्र निवेदन आहे, आमच्या नात्याबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया, हे सर्व थांबवा.सर्वांना भरपूर सारं प्रेम.
धनश्री वर्माने फॅन्सना धक्का देत आपल्या नावामधून चहल आडनाव काढून टाकलं आहे. तुम्ही तीचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर, युजरनेम मधून पती युजवेंद्रच आडनाव काढलय. आधी तिच इन्स्टाग्राम युजरनेम धनश्री वर्मा चहल असं होतं. लग्नानंतर तिने हे आडनाव लावलं होतं. दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली. धनश्री वर्माने आडनाव का हटवलं? तेव्हा त्या संदर्भात जास्त माहिती समोर आलेली नव्हती.
धनश्री वर्माने फक्त आडनाव हटवलय. पण फोटोज इन्स्टाग्रामवरुन डिलीट केलेले नाहीत. याच्या काही दिवस आधी चहलच्या एका पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुक्ता निर्माण केली होती. चहलने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. त्यात त्याने एका नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे, असं म्हटलं होतं.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची पहिली भेट एका ऑनलाइन डान्स क्लास मध्ये झाली होती. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीच्या क्लास मध्ये प्रवेश घेतला होता. डान्स शिकताना, शिकवताना दोघांमध्ये प्रेमसंबंध बहरले. पुढे जाऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.