Yuzvendra Chahal | वर्ल्ड कप 2023 साठी डच्चू, युझवेंद्र चहल याचा या टीम कडून खेळण्याचा निर्णय!

Team India Yuzvendra Chahal | भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी बीससीआय निवड समितीने फिरकीपटू युझवेंद्र चहल याची टीम इंडियात निवड केली नाही.

Yuzvendra Chahal | वर्ल्ड कप 2023 साठी डच्चू, युझवेंद्र चहल याचा या टीम कडून खेळण्याचा निर्णय!
दरम्यान, वर्ल्ड कपसाठी जो भारतीय संघ निवडला आहे त्यामध्ये युजवेंद्र चहल याला संधी मिळायल हवी होती. तो नाहीतर वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळायला हवी होती, असंही युवराजने सांगितलं.
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 1:14 AM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपच्या बरोबर 1 महिन्याआधी बीसीसीआय निवड समितीने 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. आशिया कप 2023 च्या टीममधूनच वर्ल्ड कपसाठी एकूण 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. यातून प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा या दोघांना डच्चू देण्यात आला. तसेच निवड समितीने आर अश्विन, युझवेंद्र चहल, शिखर धवन आणि संजू सॅमसन या चौघांबाबतही विचार केला नाही. आता वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने युझवेंद्र चहल याने मोठा निर्णय घेतला आहे.

यूझवेंद्र चहलने वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहल केंट टीमकडून काऊंटी क्रिकेट खेळू शकतो. चहलचं या निमित्ताने काऊंटी डेब्यू होऊ शकतं. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहलला बीसीसीआयकडून काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंट काउंटी क्लब क्रिकेट याबाबत अधिकृत घोषणा करु शकतं. चहल केंटसाठी 3-4 सामने खेळू शकतो. बीसीसीआयने चहलला एनओसी दिलेली आहे. टीम इंडियाला जेव्हा केव्हाही चहलची गरज असेल, तेव्हा तो संघात दाखल होईल”.

राजस्थान रॉयल्सचं सूचक ट्विट

युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळतो. आता चहल काऊंटी खेळण्यासाठी सज्ज झालाय अन् राजस्थान रॉयल्स टीमकडून ट्विट नाय, असं कसं होईल. राजस्थान टीमने चहलबाबत सूचक ट्विट केलं. या ट्विटमध्ये दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांचा केंट जाहीरातीतील फोटो आहे.

आयसीसी वर्ल्ड कप 2023चा धावता आढावा

आयसीसी वनडे वर्ल्ड कपचं भारतात 2011 नंतर 12 वर्षांनी आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला फायनल सामना पार पडणार आहे. वर्ल्ड कपमधील पहिला आणि अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये होणार आहे. या दरम्यान एकूण 45 दिवसांमध्ये देशातील 10 ठिकाणी 48 सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक टीम इतर 9 संघाविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.