‘आपल्या प्रियजणांना जपा’, आईवडिलांचा कोरोनाविरोधात लढा, युजवेंद्र चहलची भावूक पोस्ट
युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. युजवेंद्रने आपले आई बाबा आणि पत्नीसह फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोला कॅप्शन दिलंय, "आपल्या प्रियजणांना जवळ ठेवा, त्यांना जपा..." (Yuzvendra Chahal Share Emotional instagram Post After Dhanashree verma)
मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. चहलची पत्नी धनश्री वर्माने याबाबतची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर आता युजवेंद्रने भावूक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना मोलाचा सल्ला दिला आहे. युजवेंद्रने आई वडिलांचा फोटो शेअर करत आपल्या प्रियजणांना जपा, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Yuzvendra Chahal Share Emotional instagram Post After Dhanashree Verma)
चहलची इमोशनल पोस्ट
युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. युजवेंद्रने आपले आई बाबा आणि पत्नीसह फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोला कॅप्शन दिलंय, “आपल्या प्रियजणांना जवळ ठेवा, त्यांना जपा…” युजवेंद्रच्या पोस्टनंतर क्रिकेट फॅन्स त्याला धीर देत आहेत तर त्याच्या आई वडिलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
वाईट परिस्थितीतून जातंय चहल कुटुंब
आमचं कुटुंब एका मुश्किल परिस्थितीतून जात आहे. युझीच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झालीय. बाबा रुग्णालयात आहेत तर आई घरीच उपचार घेत आहे, अशी माहिती धनश्रीने केलेल्या पोस्टमधून दिली होती. “युझवेंद्रच्या वडिलांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना अधिक त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझे सासू-सासऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांना कोरोनाची तीव्र लक्षणं आहेत. सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर सासू घरीच उपचार घेत आहे. मी स्वत: रुग्णलयात असल्याने वाईट परिस्थितीचा सामना केला आहे. मी पूर्णपणे लक्ष देत आहे. मात्र आपण सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा”, असं धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?
युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.
3 क्रिकेटपटूंच्या वडिलांचे कोरोनाने निधन
दरम्यान आतापर्यंत अनेक स्टार खेळाडूंना कोरोनामुळे जीवाला मुकावे लागले आहे. काही दिवसांआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चेतन साकरियाच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले होते. आयपीएलमधून मिळालेली सर्व रक्कम चेतनने वडीलांच्या उपचारांवर लावली. मात्र चेतनच्या वडीलांची कोरोना विरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.
त्यानंतर 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य पीयूष चावलाचे वडीलांचेही कोरोनामुळे प्राणज्योत मालवली. तर 12 मे ला भारताचा माजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक रुद्रप्रताप सिंगच्या (R P Singh) वडिलांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरपीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली होती.
(Yuzvendra Chahal Share Emotional instagram Post After Dhanashree Verma)
हे ही वाचा :
चेतन साकरिया, पीयूष चावलानंतर ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन
PHOTO | लई भारी! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी विरुष्काने जमवले 11 कोटी
कॅप्टन कूल धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज