Video : इंग्लंडचा झॅक क्राउले आऊट की नॉट आऊट! सिराजने घेतलेल्या कॅचवरून सोशल मीडियावर रंगली चर्चा
भारत इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला. भारताच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. असं असलं तरी झॅक क्राउलेची विकेट चर्चेचा विषय ठरला आहे. आउट की नॉट आऊट यावरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. इंग्लंडचं बेझबॉल रणनिती पहिल्या सामन्यात हवी तशी काही चालली नाही. इंग्लंडचा संपूर्ण 246 धावा करून तंबूत परतला. पहिल्याच दिवशी सर्व गडी बाद झाल्याने टीम इंडियाला फायदा मिळाला आहे. भारताच्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने दमदार खेळीने टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या सत्रात इंग्लंडने सावध सुरुवात केली. भारताला पहिल्या 55 धावांपर्यंत एकही विकेट हाती लागली नाही. झॅक क्राउले आणि डुकेट जोडीने पहिल्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केली. डुकेटला पायचीत करत आर अश्विनने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर ऑलि पॉपला खेळपट्टीवर तग धरूच दिला नाही आणि रवींद्र जडेजाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण झॅक क्राऊलेची विकेट पडली आणि चर्चेला उधाण आलं.
इंग्लंडच्या 60 धावा असताना कर्णधार रोहित शर्माने 16 वं षटक अश्विनकडे सोपवलं. पहिल्याच चेंडूवर झॅक क्राऊले जाळ्यात अडकला. मोहम्मद सिराजने मिड ऑफला अप्रतिम झेल घेतला. पण आऊट की नॉट आऊट ही चर्चा रंगली आहे.
Ash & Miyan combine to provide #TeamIndia's third breakthrough 🔥
🎥 Zak crawls back to the dugout as 🇮🇳 pile up the pressure. Keep watching #INDvsENG thriller LIVE only on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 🎬#BazBowled #JioCinemaSports #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/KTVxpwxKkk
— JioCinema (@JioCinema) January 25, 2024
क्राऊलेचा झेलसाठी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. हा झेल वारंवार चेक केल्यानंतर बाद असल्याचं खुद्द तिसऱ्या पंचांनी सांगितलं. त्यामुळे आऊट की नॉट आऊट हा काही प्रश्न उद्भवत नाही. क्राऊलेचा झेल मिड ऑफला पकडतात हातात एक टप्पा पडल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. खासकरून पाकिस्तानी स्पोर्ट पत्रकारांना यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Another for Ashwin as Crawley steps down and Siraj takes a good catch at mid-off #INDvENG #INDvsENG #INDvENG pic.twitter.com/gNgecN3gKa
— Cricket Gapshap (@CricketGapshap) January 25, 2024
बेझबॉल रणनितीवर सिराज काय म्हणाला होता?
इंग्लंडची बेझबॉल रणनिती भारतीय खेळपट्ट्यांवर कामी येणार नाही. जर त्यांनी तशी शैली अवलंबली तर मात्र त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागेल. सामना अवघ्या दोन दिवसात संपेल असं भाकीत सिराजने वर्तवलं होतं. आता पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संघ तंबूत परतल्याने भविष्यवाणी खरी ठरते की काय असं वाटू लागलं आहे. दुसरीकडे, पहिल्या डावात मोहम्मद सिराजला एकही गडी बाद करता आलेला नाही.