Zim Afro T10 2023 | Sikandar Raza याचा झंझावात, 21 बॉलमध्ये 70 धावांची विस्फोटक खेळी
या बॅट्समनने विस्फोटक खेळी करत टीमला जिंकून दिलं. या फलंदाजाने फक्त 21 बॉलमध्ये 70 धावांची सनसनाटी खेळी केली.
हरारे | झिंबाब्वेमध्ये झिम एफ्रो टी 10 लीग खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील 12 व्या सामन्यात बुलावायो ब्रेव्हस विरुद्ध हरारे हरिकेन्स आमनेसामने होते. हरारे हरिकेन्स टीमचं नेतृत्व इंग्लंडचा इयॉन मॉर्गन करत होता. तर झिंबाब्वेचा स्टार ऑलराउंडर सिंकदर रजा याच्याकडे बुलावायो ब्रेव्हसच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. बुलावायो ब्रेव्हसने टॉस जिंकून हरारे हरिकेन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हरारे हरिकेन्स टीमने निर्धारित 10 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 134 धावा केल्या. त्यामुळे बुलावायो ब्रेव्हसला विजयासाठी 135 रन्सचं टार्गेट मिळालं.
बुलावायो टीम 135 धावांच्या पाठलागासाठी मैदानात उतरली. मात्र टीमचा अपेक्षित सुरुवात झाली नाही. बेन मॅकडरमॉट 8 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन सिकंदर रझा मैदानात आला. सिंकदरने सुरुवातीपासून दे दणादण फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रझाने वादळी खेळी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
सिंकदर रजा याचं वेगवान अर्धशतक
Sikandar Raza smacks a half century off 15 balls. The fastest in the ZimAfro T10! pic.twitter.com/rxy9UjuO5F
— Adam Theo??? (@AdamTheofilatos) July 24, 2023
सिंकदरने अवघ्या 15 बॉलमध्ये खणखणीत अर्धशतक पूर्ण केलं. सिंकदरने या स्पर्धेत वेगवान अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. सिंकदरने या अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. गोलंदाजांना धु धु धुतलं. सिंकदर अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. त्याने विस्फोटक बॅटिंग केली. मात्र टीमचा स्कोअर 133 असताना सिंकदर आऊट झाला. मात्र तोवर सिंकदरने टीमला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवलं.
सिंकदरने 21 बॉलमध्य 70 रन्स केल्या.सिंकदरने या दरम्यान 6 कडक सिक्स आणि 5 चौकार ठोकले. सिंकदर बुलावायोच्या विजयाचा हिरो ठरला. बुलावायोने 135 धावांचं विजयी आव्हान 9.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सिंकदर आणि बेन या दोघांशिवाय कोबे हर्फ्ट याने 41, ब्यू वेबस्टर याने नाबाद 12 धावा केल्या.
सिंकदर रजा ‘मॅन ऑफ द मॅच’
दरम्यान सिंकदर रजा याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. सिंकदरने 70 धावा आणि 1 विकेट घेत ऑलराउंड कामगिरी केली.
बुलावायो ब्रेव्हस प्लेइंग इलेव्हन | सिकंदर रझा (कॅप्टन), बेन मॅकडरमॉट (विकेटकीपर), ब्यू वेबस्टर, रायन बर्ल, टिमिसेन मारुमा, थिसारा परेरा, पॅट्रिक डूली, जॅक प्रेस्टविज, टायमल मिल्स, तस्किन अहमद आणि फराज अक्रम.
हरारे हरिकेन्स प्लेइंग इलेव्हन | इऑन मॉर्गन (कॅप्टन), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), एविन लुईस, रेगिस चकाब्वा, डोनाव्हॉन फरेरा, इरफान पठाण, समित पटेल, ब्रँडन मावुता, नांद्रे बर्गर, ल्यूक जोंगवे आणि मोहम्मद नबी.