Zim Afro T10 2023 | टी10 क्रिकेट स्पर्धेच्या थराराला आजपासून ‘ओपनिंग’, टीम इंडियाच्या 6 दिग्ग्जांचा समावेश
Zim Afro T10 2023 Schedule And Live Streaming | या स्पर्धेतील सर्व सामने हे हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
हरारे | क्रिकेट विश्वात आजपासून (20 जुलै) एका नव्या अध्यायाला सुरुवात होतेय. झिंबाब्वे एफ्रो टी 10 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा हा पहिलाच हंगाम आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा अबुधाबीत खेळवण्यात येणाऱ्या टी 10 स्पर्धेचा एक भाग आहे. ही स्पर्धा एकूण 10 दिवस होणार असून एकूण 24 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 20 जुलैपासून होतेय तर महाअंतिम सामना हा 29 जुलैला पार पडेल. विशेष बाब म्हणजे सर्व सामने हे हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
विशेष बाब म्हणजे टीम इंडियासाठी खेळलेल्या 6 माजी अनुभवी खेळाडूंचा यात समावेश आहे. तसेच अन्य संघातील आजी माजी खेळाडूही खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
टीम इंडियाच्या दिग्गजांचा समावेश
दरम्यान या स्पर्धेत टीम इंडियाचे एकूण 6 दिग्गज क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या 6 पैकी 4 खेळाडू वर्ल्ड कप विजेत्या संघाचे भागही राहिले आहेत. भारताच्या 6 खेळाडूंमध्ये इरफान पठाण, एस श्रीसंथ,युसूफ पठाण, पार्थिव पटेल आणि स्टुअर्ट बिन्री याचा समावेश आहे.
5 संघ आणि त्यांची नावं
हरारे हरिकेन्स, बुलावायो ब्रेव्स, केपटाऊन सँप आर्म, डरबन कलंदर्स आणि जोहान्सबर्ग बफेलोज या 5 संघांमध्ये ट्रॉफासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
भारतात हे सामने कुठे पाहता येणार? Zim Afro T10 League 2023 Digital Streaming
झिंबाब्वे एफ्रो टी 10 लीग स्पर्धेतील सामन्यांचं टीव्हीवर प्रक्षेपण करण्यात येणार नाही. मात्र फॅन कोड आणि जिओ सिनेमा एपवर हे सर्व सामने पाहता येतील.
हरारे हरिकेन्स टीम | इयन मोर्गन, मोहम्मद नबी, एविन लुईस, रॉबिन उथप्पा, एस श्रीसंथ, इरफान पठाण, डोनोवन फरेरा, शाहजवाज, दहानी, डुआन जानसेन, समित पटेल, केविन कोथिगोडा, क्रिस्टोफर एमपोफू, रेगिस चकाबवा, ल्यूक जोनवे, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुशिवा आणि खालिद शाह.
बुलावायो ब्रेव्स टीम | सिकंदर रझा, तास्कीन अहमद, एश्टन टर्नर, टायमल मिल्स, मुजीब उर रहमान थिसारा परेरा, बेन मॅकडरमॉट, ब्यू वेबस्टर, पॅट्रिक डूले, कोबे हर्फ्ट, रयान बर्ल, टिमिसेन मारुमा, जॉयलॉर्ड गम्बी, फराज अकरम आणि इनोसेन्ट कॅया.
केपटाऊन सँप आर्म टीम | रहमानुल्लाह गुरबाज, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, शॉन विलियम्स, भानुका राजपक्षे, महीश तीक्षणा, शेल्डन कॉट्रेल, करीम जनत, चमिका करुणारत्ने, पीटर हाजलोगौ, मॅथ्यू ब्रीत्जके, रिचर्ड नगारावा, सेफस जुवाओ, हॅमिल्टन मसाकाद्जा, तदिवानाशे मारुमानी, तिनशे कामुनहुकामवे आणि मोहम्मद इरफान.
डरबन कलंदर्स टीम | आसिफ अली, मोहम्मद आमिर, जॉर्ज लिंडे, हजरतुल्लाह झझाई, टिम सीफर्ट, सिसंदा मगला, हिल्टन कार्टराईट, मिर्जा ताहिर बेग, तय्यब अब्बास, तेंडाई चतारा, ब्रॅड इवान्स, क्लाइव मँडेंडे, निक वेल्च आंद्रे फ्लेचर आणि क्रेग एर्विन.
जोहान्सबर्ग बफेलोज टीम | मुश्फिकुर रहीम, यूसुफ पठाण, मोहम्मद हफीज, राहुल चोपडा, ओडियन स्मिथ,टॉम बँटन, विल स्मीड, नूर अहमद, रवि बोपारा, उस्मान शिनवारी, जूनियर डाला, ब्लेसिंग मुजाराबानी, वेलिंगटन मसाकाद्जा, वेस्ले मधेवेरे, विक्टर न्याउची आणि मिल्टन शुंबा.
झिंबाब्वे एफ्रो टी 10 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 19, 2023
स्पर्धेतील सलामीचा सामना कुणाचा?
या स्पर्धेतील सलामीचा सामना हा हरारे हरिकेन्स विरुद्ध बुलावायो ब्रेव्हस यांच्या खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे