ZIM vs IND: झिंबाब्वे विरुद्ध आक्रमक फलंदाजाचं पदार्पण फिक्स, ‘हा’ शर्मा खेळणार, कॅप्टन शुबमनची घोषणा
Zimbabwe vs India 1st T20i: झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेला 5 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी कॅप्टन शुबमन गिलने मोठी घोषणा केली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप विजयासह टीम इंडियाचा कॅप्टन ओपनर रोहित शर्मा याने टी20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितसह विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही निवृत्ती घेतली. वर्ल्ड कप जल्लोषानंतर आता टीम इंडिया पहिली टी 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया 6 जुलैपासून झिंबाब्वे विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सिकंदर रझा याच्याकडे झिंबाब्वेच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर शुबमन गिल याच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आहे. टीम इंडिया पहिल्यांदाच रोहित-विराट यांच्याशिवाय खेळणार आहेत. त्यामुळे झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडियाला नवा शर्मा भेटला आहे.
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडू खेळणाऱ्या अभिषेक शर्मा याची झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. रोहित आणि अभिषेक या दोघांमध्ये साम्य असं की ते दोघे ओपनर आहेत. तसेच अभिषेक रोहितसारखाच विस्फोटक पद्धतीने खेळतो. अभिषेकची बॅटिंग क्रिकेट चाहत्यांनी आयपीएलच्या 17 व्या मोसमात पाहिलीय. त्यात आता अभिषेक झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्याच सामन्यातून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या टी 20 आय सामन्याच्या पूर्वसंध्येला कॅप्टन शुबमन गिलने मोठी घोषणा केली. अभिषेक शर्मा माझ्यासह ओपनिंग करणार असल्याचं जाहीर केलंय. याचाच अर्थ अभिषेक शर्मा हा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते आता रोहितनंतर अभिषेकची तुफानी बॅटिंग पहाण्यासाठी सज्ज आहेत.
शुबमन गिल काय म्हणाला?
India will field a new-look side against Zimbabwe on Saturday in the first T20I 👀
More from skipper Shubman Gill ⬇#ZIMvINDhttps://t.co/IOpVaZpRbQ
— ICC (@ICC) July 5, 2024
झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुशार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.
झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.