ZIM vs IND 1st T20I: टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडसमोर झिंबाब्वेचं आव्हान, पहिला सामना कुठे पाहता येणार?

Zimbabwe vs India 1st T20I Live Streaming: टीम इंडियाच्या झिंबाब्वे दौऱ्याला 6 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20 मालिका खेळणार आहे.

ZIM vs IND 1st T20I: टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडसमोर झिंबाब्वेचं आव्हान, पहिला सामना कुठे पाहता येणार?
zim vs ind
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 8:19 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वात सिनिअर टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष झाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड शुबमन गिल याच्या नेतृत्वात झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. शुबमन गिल या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सिकंदर रजा याच्या खांद्यावर झिंबाब्वेची जबाबदारी आहे. टी 20 मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना केव्हा?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना शनिवारी 6 जुलै रोजी होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना कुठे?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामन्याला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 4 वाजता टस होईल.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच डीडी स्पोर्ट्स (फ्री टु एअर) चॅनेलवर पाहायला मिळेल.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुशार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.

झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.