ZIM vs IND Toss: टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, तुषार देशपांडेचं डेब्यू
Zimbabwe vs India 4th T20I Toss Update: कॅप्टन शुबमन गिल याने टॉस जिंकला असून झिंबाब्वे विरुद्ध चेस करण्याचा निर्णय घेतला आहे.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20 मालिकेतील चौथ्या सामन्याचं आयोजन हे हरारे स्पोर्ट्स क्लब येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजता टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन शुबमन गिल याने फिल्डिंगचा निर्णय घेतल झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून देशातंर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा आणि आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळणाऱ्या कल्याणच्या तुषार देशपांडे याने पदार्पण केलं आहे. तुषारला आवेश खान याच्या जागी संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. आवेशच्या जागी तुषार याला संधी दिली गेली आहे. तर झिंबाब्वे टीममध्ये वेलिंग्टन मसाकाडाझा याच्या जागी फराज अक्रम याचा समावेश करण्यात आल्याची माहिती कॅप्टन सिकंदर रझा याने टॉसवेळेस दिली. तसेच आम्हाला पहिले बॅटिंगच करायची असल्याचं रझा म्हणाला. त्यामुळे झिंबाब्वेला टॉस गमावूनही हवं तेच मिळालं.
टीम इंडिया आघाडीवर
दरम्यान टीम इंडिया या मालिकेत आतापर्यंत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला झिंबाब्वेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
तुषार देशपांडेचं आंतरराष्ट्रीय पदार्पण
Tushar Deshpande is all set to make his international Debut!
He receives the cap 🧢 in presence of his wife 👏👏
Go well! 🙌
Follow The Match ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/kRtjgxmOJ0
— BCCI (@BCCI) July 13, 2024
झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कॅप्टन), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.