ZIM vs IND 4th T20I Live Streaming: झिंबाब्वे टीम इंडिया विरुद्ध कमबॅक करणार? चौथा सामना कुठे?
Zimbabwe vs India 4th T20I Live Streaming: टीम इंडिया झिंबाब्वे विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.
झिंबाब्वे विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने शुबमन गिलच्या नेतृत्वात सलग 2 सामने जिंकले. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील चौथा सामना हा निर्णायक असणार आहे. झिंबाब्वेसमोर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवायची संधी आहे. तर टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. त्यामुळे चौथ्या टी 20 सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना केव्हा?
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना शनिवारी 13 जुलै रोजी होणार आहे.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना कुठे?
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथ्या टी 20 सामन्याला 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 4 वाजता टॉस होईल.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20 सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा , तुषार देशपांडे आणि हर्षित राणा.
झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.