ZIM vs IND: अभिषेक शर्माचा पदार्पणातील मालिकेत महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
IND vs ZIM: अभिषेक शर्मा या युवा आणि विस्फोटक खेळाडूने झिंबाब्वे विरुद्ध महारेकॉर्ड केलाय. अभिषेक पदार्पणातील टी 20i मालिकेत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आतापर्यंत उल्लेखनीय कामिगिरी केली आहे. टीम इंडियाने शनिवारी 13 जुलै रोजी झिंबाब्वेवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जींकली. टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली. झिंबाब्वे विरूद्धच्या या मालिकेतून अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधींचं सोनं करत आपली छाप सोडली. त्यापैकी एक म्हणजे आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्मा. झिंबाब्वे विरुद्ध 23 वर्षीय अभिषेकने आपली निवड योग्य ठरवली आहे. अभिषेकने चौथ्या टी 20 सामन्यात मोठा कारनामा केला. अभिषेक टीम इंडियाकडून टी 20I मध्ये अशा कारनामा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अभिषेकआधी असं कुणालाही भारतीय खेळाडूला जमलं नव्हतं.
अभिषेक शर्माने झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. अभिषेक पहिल्याच सामन्यात झिरोवर आऊट झाल्याने निराशा झाली. मात्र त्यानंतर अभिषेकने दणक्यात कमबॅक केलं. अभिषेकने दुसऱ्याच सामन्यात खणखणीत शतक ठोकलं. त्यानतंर अभिषेकला चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सने विजय झाल्याने बॅटिंगची संधी मिळाली नाही. मात्र अभिषेकने बॉलिंगने योगदान दिलं. अभिषेकने 1 विकेट घेतली. अभिषेकने यासह महारेकॉर्ड केला. अभिषेक एकाच टी 20 मालिकेत शतक आणि 1 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला.
अभिषेक शर्मा याच्याआधी दिग्गज लाला अमरनाथ आणि कपिल देव या दोघांनी अनुक्रमे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा कारनामा केला आहे. लाला अमरनाथ यांनी टेस्ट तर कपिल देव यांनी वनडेमध्ये असा कारनामा केला होता.
अभिषेक शर्मा : झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिका 2024
लाला अमरनाथ : विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिका 1933
कपिल देव : वनडे, 1983 वर्ल्ड कप
झिंबाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कॅप्टन), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि तेंडाई चतारा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.