Indian Cricket Team: टीम इंडियाला मोठा धक्का, हा युवा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
Indian Cricket Team: टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. युवा खेळाडू दुखापतीमुळे टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड वर्ल्ड कप 2024 सेमी फायनलआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याला बीसीसीआयने मोठी संधी दिली आहे. बीसीसीआयने शिवम दुबेला वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्याऐवजी त्याला झिंबाब्वे दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. शिवम दुबेला आयपीएलच्या 17 व्या मोसमात बॉल आणि बॅटने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नितीश रेड्डी याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. नितीश रेड्डीला झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 सीरिजआधी दुखापत झाल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही माहिती दिली आहे. नितीशला नेमकं काय झालंय? हे सांगितलं नाही, मात्र त्याच्यावर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचं बीसीसीआयने म्हटलंय.
टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. मात्र तोवर नितीश झालेल्या दुखापतीतून सावरु शकणार नसल्याचं निश्चित असल्याने त्याला बाहेर पडावं लागलं. त्यामुळे शिवमचा समावेश केला गेला आहे.
युवासेनाला संधी
दरम्यान बीसीसीआय निवड समितीने मिशन झिंबाब्वेसाठी युवा आणि नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली आहे. झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेत शुबमन गिल हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळणाऱ्या तरुण तडफदार खेळाडूंची पहिल्यांदा निवड केली गेली आहे. तुषार देशपांडे (चेन्नई), रियान पराग (राजस्थान) आणि अभिषेक शर्मा (हैदराबाद) या संघांसाठी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या या खेळाडूंची भारतीय संघात पहिल्यांदा निवड करण्यात आली आहे.
शिवम दुबेला संधी
🚨 NEWS 🚨
Shivam Dube replaces Nitish Reddy in the #TeamIndia squad for the series against Zimbabwe. #ZIMvIND
Details 🔽https://t.co/WMktNAIDIx
— BCCI (@BCCI) June 26, 2024
टी 20 मालिकेचं शेड्यूल
पहिला सामना, 6 जुलै. दुसरा सामना, 7 जुलै. तिसरा सामना, 10 जुलै. चौथा सामना, 13 जुलै. पाचवा सामना, 14 जुलै.
टीम इंडियाचा सुधारित संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकटेकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर ), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे.