World Cup 2024 | वर्ल्ड कपमध्ये आणखी 2 संघांची एन्ट्री, 18 टीम निश्चित
Icc World Cup 2024 | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी आणखी 2 संघांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता कोणत्या संघामध्ये वर्ल्ड कप होणार हे फिक्स झालं आहे.
केप टाऊन | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा पार पडल्यानंतर आता नववर्षात अंडर 19 वर्ल्ड कप, आयपीएल आणि मेन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध क्रिकेट चाहत्यांना लागले आहेत. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी एकूण 18 संघ निश्चित झाले आहेत. या स्पर्धेसाठी 2 संघांनी आज सोमवारी 18 डिसेंबर रोजी क्वालिफाय केलं आहे. वर्ल्ड कपसाठी 16 संघांनी स्थान मिळवलं होतं. मात्र 2 संघांनी आफ्रिका क्वालिफायर स्पर्धेतून तिकीट निश्चित केलं आहे. आफ्रिका क्वालिफायरमधून युगांडा आणि झिंबाब्वे आता आगामी वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलंय.
आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन हे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 18 टीम एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. वूमन्स टी 20 वर्ल्ड कपचं यजमानपद हे बांगलादेशकडे आहे. यजमान असल्याने बांगलादेशने थेट क्वालिफाय केलंय. तसेच गेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये अवव्ल 6 संघांना या स्पर्धेसाठी थेट तिकीट मिळालंय. या सहा संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, टीम इंडिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. तसेच पाकिस्ताननेही थेट क्वालिफाय केलं. त्यामुळे अशाप्रकारे 8 संघ आधीच फिक्स झाले होते.
तसेच दुसऱ्या बाजूला आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलँड, श्रीलंका, थायलँड, यूएई आणि वानुअतू या हे संघही पात्र ठरले. त्यामुळे अखेरच्या 2 जागी रिकामी होत्या. या 2 जागांसाठी क्वालिफायर युगांडा आणि झिंबाब्वेने क्वालिफाय केलं. हे दोन्ही संघ त्यांच्या ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये होते.
यूगांडा आणि झिंबाब्वे क्वालिफाय
Line-up for the ICC Women’s @T20WorldCup Global Qualifiers is now complete.
Details 👇https://t.co/YNjB7cuaBj
— ICC (@ICC) December 18, 2023
1 ट्रॉफी 18 नेशन
दरम्यान आता या वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बांगलादेश (यजमान) , टीम इंडिया, श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्टइंडीज, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलँड, थायलँड, यूएई, यूएसए, वानुअतु, झिंबाब्वे आणि युगांडा हे संघ खेळताना दिसणार आहेत.