Heath Streak Death : आशिया कपदरम्यान ‘या’ दिग्गजाने वयाच्या 49 वर्षी घेतला अखेरचा श्वास, क्रिकेट विश्वावर शोककळा
आशिया कप दरम्यान क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. देशासाठी वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन झालं आहे.
मुंबई : आशिया कपचा महासंग्राम सुरू असताना क्रिकेट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हीथ स्ट्रीक यांचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी हीथ स्ट्रीक यांच्या निधनाची अफवा समोर आली आहे. त्यावेळी स्ट्रीक यांच्या घरच्यांकडून ही आपण जिवंत असून निधन ही अफवा असल्याची माहिती दिली होती. आता हीथ स्ट्रीक यांच्या पत्नी आणि वडिलांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हीथ स्ट्रीक हे कर्करोगाच्या आजारासोबत झुंज देत होते. रविवारी रात्री एकच्या सुमरास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. हीथ स्ट्रीक यांच्या पत्नीने याबाबत पोस्ट करत माहिती दिली.
हीथ स्ट्रीक यांनी 65 कसोटी सामने आणि 189 वन डे सामने खेळले असून कसोटीमध्ये 1990 तर 3 हजार धावा केल्या आहेत. त्यासोबतच कसोटीमध्ये 216 आणि वन डे मध्ये 239 विकेट्स घेतल्या आहेत. हीथ हा झिम्बाब्वेकडून कसोटी आणि वन डे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.
हीथ स्ट्रीक याने 1993 साली झिम्बाब्वे संघाकडून पदार्पण केलं होतं. स्टार ऑल राऊंडर असलेल्या हीथने याची कसोटी मधील 9/72 अशी बेस्ट कामगिरी आहे. सात वर्षांनंतर हीथ स्ट्रीक याने 2000 ते 2004 मध्ये संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. 100 विकेट घेणारा तो झिम्बाब्वे संघाचा एकमेक खेळाडू आहे. झिम्बाब्वेला त्याने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, हीथ स्ट्रीक यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. 23 ऑगस्टला त्याच्या मृत्यच्या बातमीची अफवा पसरली होती. तेव्हा स्ट्रीकचा मित्र हेनरी ओलांगने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. तिसऱ्या पंचांनी त्याला परत पाठवलं असून तो जिवंत आहे, असं म्हटलं होतं.