Graeme Smith | बालहट्टापुढे माजी कर्णधार स्मिथची माघार, बाप लेकाचा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

ग्रॅम स्मिथ (graeme smith) दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. स्मिथची 2019 मध्ये आफ्रिकेच्या क्रिकेट संचालकपदी निवड करण्यात आली होती.

Graeme Smith | बालहट्टापुढे माजी कर्णधार स्मिथची माघार, बाप लेकाचा भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
ग्रॅम स्मिथ
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 12:40 PM

केपटाऊन : दक्षिण आफ्रिका क्रिकेट ( Cricket South Africa) बोर्डाचा संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅम स्मिथचा (Graeme Smith) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होण्यामागे कारणही तसंच आहे. या व्हिडीओत स्मिथचा मुलगा कार्टर आपल्या बाबाला बुटाची लेस बांधायला सांगतोय. या व्हिडीओत कार्टरने त्याच्या निरागसतेमुळे सर्वच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. स्मिथ व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे एका पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. (cricket south africa director graeme smith son interrupt during online press conference for shoelaces)

आफ्रिकेचा संघ खूप वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर (south africa tour of pakistan 2021) गेला आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये कसोटी आणि टी 20  मालिका खेळण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रॅम पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसतोय. व्हिडीओमध्ये स्मिथचा मुलगा कार्टर मागे पळताना पाहायला मिळतोय. तसेच तो स्मिथला बुटाची लेस बांधायला सागंतोय. लाईव्ह पत्रकार परिषद असल्याने स्मिथ त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र स्मिथला अखेर बालहट्टापुढे झुकावेच लागले. अखेर स्मिथने आपल्या मुलाच्या बुटाची लेस बांधली.

स्मिथ ऑगस्ट 2011मध्ये केपटाऊन येथे आयर्लंडमधील गायिका मॉर्गन डीनसोबत विवाहबद्ध झाला. स्मिथला डीनपासून 2 अपत्य आहेत. लग्नाच्या वर्षभरानंतर 2012 ला स्मिथला पुत्ररत्न प्राप्त झालं. यानंतर 2013मध्ये कार्टरचा जन्म झाला. 2015 मध्ये या स्मिथ दांपत्यांनी घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केल. यानंतर 2016 मध्ये स्मिथची दुसरी पत्नी रोमीने स्मिथच्या तिसऱ्या पुत्राला जन्म दिला.

क्रिकेट कारकिर्द

स्मिथ आफ्रिकेच्या यशस्वी फलंदाज आणि कर्णधारांपैकी आहे. स्मिथ वयाच्या अवघ्या 22 वर्षी आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणारा युवा कर्णधार ठरला होता. स्मिथने कसोटी कारकिर्दीत एकूण 117 सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 48.25 च्या सरासरीने 27 शतक आणि 38 अर्धशतकासह 9 हजार 265 धावा केल्या आहेत. स्मिथ कसोटीमध्ये आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे.

असा आहे आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा

आफ्रिका पाकिस्तान दौऱ्यात कसोटी आणि टी 20 मालिका खेळणार आहे. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून (26 जानेवारी) सुरुवात झाली आहे. या कसोटी मालिकेनंतर 3 मॅचची टी 20 सीरिज खेळली जाणार आहे.

पहिली कसोटी, 26-30 जानेवारी, कराची

दुसरी कसोटी, 4-8 फेब्रुवारी, रावळपिंडी

टी 20 मालिका

पहिली टी 20, 11 फेब्रुवारी, लाहोर

दुसरी टी 20, 13 फेब्रुवारी, लाहोर

तिसरी टी 20, 14 फेब्रुवारी, लाहोर

संबंधित बातम्या :

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची निवृत्तीची घोषणा

(cricket south africa director graeme smith son interrupt during online press conference for shoelaces)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.