मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी वेस्ट इंडीज दौऱ्यावर न जाता 15 दिवसांसाठी आर्मी ट्रेनिंगला गेला. धोनीच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातून त्याचं कौतुक करण्यात आलं. धोनीने 15 ऑगस्टपर्यंत टेरिटोरिअल आर्मीमध्ये राहून ट्रेनिंग पूर्ण केलं. ट्रेनिंन पूर्ण झाल्यानंतर धोनी 16 ऑगस्टला नवी दिल्लीत परतला. धोनी आता मुंबईत असून सध्या तो आपल्या व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त आहे.
मित्रांसोबत महेंद्रसिंह धोनी
धोनीचा मॅनेजर आणि लहाणपणीचा मित्र मिहिर दिवाकरने सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी मुंबईच्या ग्रीन व्हॅली स्टुडिओमध्ये आपल्या मित्रांसोबत दिसत आहे. मंगळवारीही (20 ऑगस्ट) धोनी एका शूटिंगमध्ये व्यस्त होता.
New look for the captain today. #hot #dhoni #captainsaab @madOwothair pic.twitter.com/ZxEuyPkHLj
— Sapna Moti Bhavnani (@sapnabhavnani) August 19, 2019
धोनी प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट सपना भवनानीसोबत मेहबूब स्टुडीओमध्येही दिसला. सपनानेही धोनीच्या हेअरस्टाईलमध्ये बदल केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
MS Dhoni getting ready for Shoot ??
PC : @sapnabhavnani#Dhoni #MSDhoni pic.twitter.com/kMoHUI0HAR
— MSDian Forever ?? (@LoyalMSDFan) August 20, 2019
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर धोनीने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घ्यावी अशी चर्चा सुरु आहे. या दरम्यान धोनी आर्मी ट्रेनिंगसाठी काश्मीरला गेला, तर दुसरीकडे भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला. पण वेस्ट इंडीज दौऱ्यावर मी अनुपस्थित असेल, याची माहिती धोनीने बीसीसीआयला दिली होती.