IndvsAus : रिषभ पंतचा विश्वविक्रम

अॅडलेड: टीम इंडियाचा यंग विकेटकीपर रिषभ पंतने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एका कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमाशी रिषभ पंतने बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत रिषभ पंतने 11 झेल पकडत, दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. या कसोटीत रिषभ पंतने यष्टीमागे तब्बल 11 झेल टिपले. यापूर्वी भारताकडून विकेटकीपर रिद्धीमान साहाने 10 झेल […]

IndvsAus : रिषभ पंतचा विश्वविक्रम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अॅडलेड: टीम इंडियाचा यंग विकेटकीपर रिषभ पंतने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एका कसोटीत सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमाशी रिषभ पंतने बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत रिषभ पंतने 11 झेल पकडत, दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. या कसोटीत रिषभ पंतने यष्टीमागे तब्बल 11 झेल टिपले. यापूर्वी भारताकडून विकेटकीपर रिद्धीमान साहाने 10 झेल टिपले होते. त्याचा विक्रम रिषभ पंतने मोडत, सर्वाधिक झेल घेणारा पहिला भारतीय  ठरला.

रिषभ पंतने आज मिचेल स्टार्कचा झेल टिपला आणि 11 वा झेल आपल्या नावे केला. यावर्षी जानेवारीमध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिक दौऱ्यादरम्यान केपटाऊन कसोटीत पंतने दहा झेल पकडले होते.

महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2014 च्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात नऊ कॅच पकडले होते.

पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात सहा झेल पकडले.  त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात 5 झेल टिपत नव्या विक्रमाशी बरोबरी केली.

एका सामन्यात सर्वात जास्त कॅच पकडण्याच्या यादीत इंग्लंडचा माजी विकेटकीपर जॅक रसल आणि साऊथ अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स 11 झेलसह टॉपवर आहेत. जॅक रसलने 1995 मध्ये साऊथ अफ्रिका विरुद्ध जोहान्सबर्गमधील सामन्यात 11 झेल घेतले होते.तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डिव्हिलियर्सने या विक्रमाशी बरोबरी केली होती.

भारताच विजय

दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या अॅडलेड कसोटीत 31 धावांनी विजय मिळवला आहे.  भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 291 धावात गुंडाळून, पहिली कसोटी 31 धावांनी खिशात घातली. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 250 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा 235 धावात गुंडाळून केवळ 15 धावांची आघाडी घेतली होती. मग दुसऱ्या डावात भारताने 307 धावा करत, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 322 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला झेपलं नाही.

दुसऱ्या डावात भारताकडून बुमराह , अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर विकेट घेतल्या.

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.