चेतन साकरिया, पीयूष चावलानंतर ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

आरपी सिंहच्या वडीलांना (Rudra Pratap Singh) काही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आरपीने आयपीएलच्या 14 व्या मोसमातून माघार घेतली होती.

चेतन साकरिया, पीयूष चावलानंतर 'या' क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन
Irfan Pathan, Rudra Pratap Singh, M S Dhoni
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 4:06 PM

मुंबई : जगभरात कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सर्वांवर संकट ओढावला आहे. या कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. क्रिकेट विश्वही याला अपवाद नाही. पियूष चावला आणि चेतन साकरिया दोघांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. त्यात आता टीम इंडियाचा माजी खेळाडू रुद्रप्रताप सिंह (R P Singh) वर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आरपीचे वडील शिवप्रताप सिंह यांचे आज (12 मे) कोरोनाने निधन झाले आहे. आरपीने वडीलांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच काही दिवसांपूर्वी आयपीएलमधून माघार घेतली होती. शिवप्रताप सिंह यांच्यावर लखनऊमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. आरपीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (cricketer rudra pratap singh father Shiv Prasad Singh passed away due to corona)

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“माझे वडील शिवप्रसाद सिंह यांचे निधनाचे वृत्त सांगताना मला दु:ख होतंय. त्यांचा कोरोना विरुद्धचा लढा अयशस्वी ठरला. त्यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. माझ्या आणि वडीलांसाठी आपण सर्वांनी प्राथना करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो”, असं आरपीने या ट्विटमध्ये म्हंटलंय.

दरम्यान याआधी टीम इंडियाचा फिरकीपटू आणि 2011 च्या वर्ल्ड कप विजेच्या संघाचा सदस्य पीयूष चावलालाही पितृशोक झाला होता. पीयूषचे वडील प्रमोद कुमार चावलांचं 10 मे ला कोरोनामुळे निधन झालं होतं. पीयूषने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली होती.

तसेच त्याआधी रविवारी 9 मे रोजी राजस्थान रॉयल्स संघाचा चेतन साकरियाच्या वडीलांनाही कोरोनामुळे प्राण गमावावे लागले. साकरियाने आयपीएलमधून मिळालेली सर्व रक्कम पणाला लावली. बाबांना वाचवण्यासाठी त्याने शक्य ते प्रयत्न केले. मात्र त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला.

चेतन साकरियाने आयपीएलमधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय. वडिलांच्या जाण्याने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळला

संबंधित बातम्या :

2011 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन

IPL चा सर्व पैसा खर्च करण्याची तयारी, तरीही पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

(cricketer rudra pratap singh father Shiv Prasad Singh passed away due to corona)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.