मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची प्रेमकहाणीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. क्रिकेटमधलं काहीच माहिती नसताना अंजली सचिनच्या (Sachin Tendulkar) प्रेमात कशी पडली? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना कायमच पडतो. सचिनला एअरपोर्टवर पाहता क्षणीच अंजली (Anjali Tendulkar) त्याच्या प्रेमात पडली होती. इतकंच काय वेड्यासारखी एअरपोर्टवर सचिनच्या मागे धावत होती. याबाबत अंजलीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 1990 साली सचिन तेंडुलकर आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्यावरून भारतात परतला आणि मुंबई एअरपोर्टवर उतरला. त्याचवेळी अंजली आपल्या आईला रिसीव करण्यासाठी एअरपोर्टवर गेली होती. एअरपोर्ट गॅलरीतून अंजलीची नजर सचिन तेंडुलकरवर पडली आणि प्रेमाची सुरुवात झाली. अंजली सचिनपेक्षा सहा वर्षाने मोठी आहे. सचिन 22 वर्षांचा आणि अंजली 28 वर्षांचा असताना दोघांनी 24 मे 1995 ला लग्न केलं.
“मला माहिती नव्हतं की सचिन 17 वर्षांच्या की आणखी किती वर्षांचा..मला हे माहिती नव्हती सचिन कोण आहे? माझी मैत्रिण अपर्णा माझ्यासोबत होती. तिने मला सांगितलं की, तू त्याला ओळखत नाही. तो क्रिकेट जगतातील वंडर बॉय आहे. नुकत्याच झालेल्या दौऱ्यात त्याने शतक ठोकलं आहे. पण मला त्याबाबत काहीच माहिती नव्हतं. मला क्रिकेटमध्ये काहीच रस नव्हतं. पण मी त्याला पाहिलं आणि प्रेमात पडली. एअरपोर्ट गॅलरीतून मी मागे धावू लागली. माझी आई एअरपोर्टवर येणार आहे हे देखील मी विसवून गेली आणि ओरडू लागली सचिन सचिन…” असं अंजली तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितलं.
“अजित आणि नितीनसोबत असल्याने सचिन तेव्हा लाजला. त्याने माझ्याकडे पाहिलं देखील नाही. तो तेव्हा पायाकडे पाहात होता आणि गाडीत बसून निघून गेला. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेली आणि मेडिसिनच्या अंतिम वर्षाला होती. माझा मित्र मोफी त्याला क्रिकेटबाबत बरंच काही माहिती होतं. तो क्रिकेट देखील खेळायचा. मी त्याला पकडलं आणि त्याला सांगितलं की, माझ्यासाठी एक काम कर मला सचिन तेंडुलकरचा नंबर हवा आहे. तेव्हा त्याने एका नातेवाईकाकडून सचिनचा नंबर घेऊन दिला. त्यानंतर मी फोन केला. तेव्हा सचिन कधीच फोन उचलत नव्हता. पण योगायोगाने त्याने त्या दिवशी फोन उचलला. तेव्हा मी सांगितलं की मी अंजली बोलतेय. तू मला ओळखत नाही. पण मी तुला काल एअरपोर्टवर पाहिलं होतं. तेव्हा सचिन म्हणाला मला माहिती आहे. तेव्हा मी त्याला विचारलं खरंच तू मला ओळखलं का? तेव्हा मी कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता. तेव्हा सचिनने ऑरेंज कलरचं टीशर्ट घातलं. तेव्हा मला आनंद झाला की सचिनने मला नोटीस केलं होतं.”, असं सांगत नंतर प्रेम कहाणी फुलत गेली असं अंजलीने पुढे सांगितलं.