Shahid Afridi | ‘हा’ स्टार गोलंदाज बनणार शाहिद आफ्रिदीचा जावई
शाहिद आफ्रिदीचा जावई (Shahid Afridi) होणारा शाहिन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचा स्टार आणि युवा गोलंदाज शाहिन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) लवकरच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) जावई होणार आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने आफ्रिदीच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार हे वृत्त दिलं आहे. आफ्रिदीची मुलगी अक्सा आफ्रिदी (Aqsa Afridi) आणि क्रिकेटपटू शाहिन आफ्रिदी यांचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. “शाहिनच्या लग्नासाठी आम्ही शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबियांना अक्साबाबत विचारणा केली होती”, अशी माहिती शाहिनच्या वडिलांनी स्थानिक माध्यमांना दिली. (cricketer Shahid Afridi daughter Aqsa engagement with fast bowler Shaheen Shah Afridi)
या दोघांचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. पण याबाबतची कोणतीच औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. शाहिन आता क्रिकेट खेळतोय. तर अक्सा शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे हे दोघे 20 वर्षांचे आहेत. त्यामुळे साखरपुड्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र कुटुंबियांच्या माहितीनुसार लवकरच साखरपुडा उरकण्यात येणार आहे. तर पुढील 2 वर्षानंतर लग्नगाठ बांधण्यात येणार आहे. मात्र याबाबत अजूनही जाहिररित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आफ्रिदिचा होणारा जावई कोण ?
शाहिन आफ्रिदी पाकिस्तानच्या सिनिअर टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे. शाहिनने आतापर्यंत एकूण 15 कसोटी, 22 एकदिवसीय आणि 21 टी सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिधिनित्व केलं आहे. त्याने कसोटीमध्ये 48, वनडेमध्ये 45 तर टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.
यॉर्कर किंग जसप्रीतही अडकणार विवाहबंधनात
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बुमराहचा विवाह सोहळा गोव्यात मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र त्याची होणारी पत्नी कोण आहे, याबाबत अजूनही काही माहिती नाही.
लग्नासाठी बुमराहने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. तर दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनेही (Anupama Parameswaran) काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत हॅप्पी हॉलिडे असं कॅप्शन दिलं होतं. अनुपमानेही काही दिवसांची सुट्टी घेतली आहे. यामुळे बुमराह आणि अनुपमाचं नावही चर्चेत आहे. प्रसिद्ध क्रिकेट प्रेझेंटेटर (sanjana ganesan) सजंना गणेशनचंही नाव चर्चेत आहे. यामुळे बुमराहची होणारी पत्नी कोण, हे लवकरच समजणार आहे.
संबंधित बातम्या :
Jasprit Bumrah Marriage | जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार, अभिनेत्री की कॉमेंटेटर, दोन नावं चर्चेत
45 वर्षीय शाहीद आफ्रिदीला पाचवी मुलगी, नेटकरी म्हणाले, अजून 6 हव्या!
(cricketer Shahid Afridi daughter Aqsa engagement with fast bowler Shaheen Shah Afridi)