Cricket : सात बोटे असलेला क्रिकेटर, मैदानात उतरला की पाडतो षटकारांचा पाऊस
मार्टिन गप्टिलला 2013 मध्ये न्यूझिलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, 13 वर्षे त्याने चांगलं क्रिकेट खेळलं आहे.
आत्तापर्यंत अनेक क्रिकेटच्या खेळाडूंनी (Cricket Player) वेगळी कामगिरी केल्यामुळे चाहत्यांचे (Fan) ते कायम लक्षात आहेत. कारण क्रिकेट खेळ पाहणारे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे ज्यावेळी क्रिकेटची मॅच (Cricket Match) सुरु असते. त्यावेळी काही चाहते फक्त अंदाज बांधण्यात व्यस्त असतात. काही खेळाडू असे आहेत की मैदानात उतरल्यापासून आपली अनोखी खेळी करीत असतात.
प्रत्येक क्रिकेटच्या टीममध्ये असे खेळाडू असतात, ते फक्त सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध असतात. आज न्यूझिलंडचा महान फलंदाज मार्टिन गप्टिल याचा वाढदिवस आहे. त्याने आत्तापर्यंत चांगली खेळी केली आहे,
मार्टिन गप्टिलला 2013 मध्ये न्यूझिलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, 13 वर्षे त्याने चांगलं क्रिकेट खेळलं आहे.
मार्टिन गप्टिल याने आत्तापर्यंत अनेकदा वादळी खेळी केली आहे, त्यामुळे तो मैदानात आल्यानंतर अनेक गोलंदाजांना घाम फुटतो. विशेष म्हणजे मार्टिन गप्टिल याने विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज टीम विरुद्ध 237 धावा केल्या होत्या.
मार्टिन गप्टिलच्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (3497) आणि सर्वाधिक षटकार (172) आहेत.
मार्टिन गप्टिलचा तो लहान असताना एक अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या पायाची तीन बोटे कापण्यात आली. पण त्याने क्रिकेट खेळणं त्यानंतरही थांबवलं नाही.