कोरोनाबाधित माईक हसीला एअर अॅम्बुलन्सने दिल्लीहून चेन्नईला हलवलं
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू तथा चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) बॅटिंग कोच मायकल हसीला (Michael Hussey) तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालीय. त्याला पुढील उपचारासाठी दिल्लीहून चेन्नईला एअरअॅम्बुलन्सने हलवण्यात आलं आहे. (CSK Michael Hussey moved from Delhi to Chennai Air Ambulance)
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू तथा चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) बॅटिंग कोच माईक हसीला (Michael Hussey) तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालीय. त्याला पुढील उपचारासाठी दिल्लीहून चेन्नईला एअरअॅम्बुलन्सने हलवण्यात आलं आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी चेन्नईची टीम दिल्लीत होती. आयपीएल स्थगित झाल्यानंतर खेळाडूंनी आपापल्या घराचा रस्ता धरला. परंतु माईक हसीला कोरोनाची बाधा असल्याने तो उपचार घेतोय. (CSK Michael Hussey moved from Delhi to Chennai Air Ambulance)
मायकल हसीला एअर अॅम्बुलन्सने चेन्नईला हलवलं
माईक हसीला त्याची फ्रेंचायजी चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीहून चेन्नईला एअरअॅम्बुलन्सने हलवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितलं की, “बॅटिंग कोच माईक हसी आणि चेन्नईचा बोलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी यांच्यावरील अधिक चांगल्या उपचारासाठी त्यांना दिल्लीहून चेन्नईला एअरअॅम्बुलन्सने हलवण्यात आलं आहे”
मायकल हसी आणि लक्ष्मीपती बालाजी यांना कोरोनाची बाधा
चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, “चेन्नईमध्ये आमचा चांगला संपर्क आहे, त्यामुळे हसी आणि बालाजीला चेन्नईला हलविण्यासंदर्भात निर्णय झाला. कारण गरजेच्या आधी आमच्याजवळ अधिक सुविध्या असाव्यात. हसी आणि बालाजी यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे”
चेन्नईचा दमदार फॉर्म
आयपीएलचा 13 वा मोसम चेन्नईसाठी विशेष राहिला नव्हता किंबहुना साखळी फेरीतच चेन्नई गारद झाली होती. परंतु आयपीएलच्या 14 व्या पर्वात चेन्नईने बहारदार परफॉर्मन्स केला. चेन्नईने एकूण 7 मॅचेस खेळल्या ज्यापैकी 5 मॅचेसमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली. मुंबई इंडियन्सविरुद्धचाही सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. जर ड्यु प्लेसीसने पोलार्डचा तो निर्णायक झेल पकडला असता तर चेन्नईने विजयी पंच मारला असता. पण चेन्नईच्या दुर्दैवाने शेवटच्या चेंडूवर सामना गमवायला लागला.
आयपीएलचं 14 वं पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित
एप्रिलनंतर भारताता कोरोनाचे (Corona) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले. त्यात आयपीएलचं आयोजन भारतात करणं हे जोखमीचं समजलं जात होतं. अशा परिस्थिती आयपीएल भारतात खेळवणं हे धोकादायक ठरु शकतं, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. अखेर ज्याचीच भिती होती तेच झालं. एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला.
(CSK Michael Hussey moved from Delhi to Chennai Air Ambulance)
हे ही वाचा :
भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू
कोरोनाकाळात घोडेसवारी, रवींद्र जाडेजा म्हणतो, ‘मी आता पूर्णपणे सुरक्षित…!’