IPL 2020 | चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार

चेन्नई सुपरकिंग्ज संघातील अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगनेही IPL 2020 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2020 | चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार
Follow us
| Updated on: Sep 16, 2020 | 8:21 PM

मुंबई : आधी डझनभर स्टाफ कोव्हिड पॉझिटिव्ह आणि नंतर स्टार फलंदाज सुरेश रैना याने ‘आयपीएल 2020’ मधून माघार घेतल्यानंतर ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई संघातील अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगनेही बॅंक आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. (CSK Spinner Harbhajan Singh Pulls Out Of IPL 2020 Due to Personal Reasons)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 मधून वैयक्तिक कारणास्तव हरभजन सिंगने माघार घेतली आहे. त्याने शुक्रवारी आपला निर्णय चेन्नई सुपरकिंग्जला कळवला.

यंदाच्या आयपीएलमधून वैयक्तिक कारण दाखवत आपले नाव मागे घेणारा सुरेश रैनानंतर तो सीएसकेचा दुसरा खेळाडू ठरला. टीमबरोबर यूएईला प्रवास करुन रैना मायदेशी परतला होता, तर हरभजन भारतातच आहे.

दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड वगळता ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ संघातील सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दोघे बाधित खेळाडू 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी देतील. कोरोना संसर्गामुळे सीएसके संघाचे प्रशिक्षण उशिरा सुरु झाले

(CSK Spinner Harbhajan Singh Pulls Out Of IPL 2020 Due to Personal Reasons)

तीन वेळा चॅम्पियन्स ठरलेले ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ 21 ऑगस्ट रोजी आयपीएलमधील गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह यूएईमध्ये दाखल झाले होते. एमएस धोनीकडे नेतृत्व असलेल्या सीएसकेने यूएईला जाण्यापूर्वी चेन्नईत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

सीएसकेचा कणा असलेला रैना वैयक्तिक कारण सांगून आधीच भारतात परतला आहे. मात्र नुकतेच एका मुलाखतीत त्याने आयपीएल 2020 मध्ये चाहते कदाचित आपल्याला पाहतील, असे म्हणत पुनरागमनाचे संकेत दिले.

संबंधित बातम्या :

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हुकमी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना

 चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर

(CSK Spinner Harbhajan Singh Pulls Out Of IPL 2020 Due to Personal Reasons)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.