CSK vs DC, IPL 2021 | मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि अमित मिश्राचा अनोखा कारनामा
चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि अमित मिश्रा (amit mishra) या दोघांनी हा कारनामा केला आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) आणि मराठमोळा अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahne) मैदानात पाय ठेवताच एक कारनामा केला आहे. (csk vs dc ipl 2021 delhi capitals amit mishra playing 100th match and ajinkya rahane playing 150th match against chennai super kings)
A special moment ?
A night to remember for @ajinkyarahane88 as he walks out to play his 150th IPL game ?#YehHaiNayiDilli #IPL2021 #CSKvDC pic.twitter.com/sHsdE5EYGW
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2021
काय आहे कारनामा
चेन्नई विरुद्धातील हा सामना अजिंक्यच्या आयपीएल कारकिर्दीतील 150 वा सामना ठरला आहे. तर दिल्लीकडून खेळताना अमित मिश्राची ही 100 वी मॅच ठरली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच या दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
Wickets toh lete hi hain Mishi Bhai, yeh lo ek century bhi maar di ?@mishamit is playing his 1⃣0⃣0⃣th match for DC ?#CSKvDC #YehHaiNayiDilli #IPL2021 pic.twitter.com/FtVeGm9aGQ
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2021
रहाणे आणि मिश्रा अनुभवी
हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. या दोघांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये चमकदार कामिगिरी केली आहे. दोघांनी अनेकदा आपल्या संघांना विजय मिळवून दिला आहे. रहाणेसाठी आयपीएलचा गेला मोसम फार विशेष ठरला नव्हता. त्यामुळे रहाणेची या मोसमात शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर मिश्रालाही गत मोसमात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून या हंगामात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान
चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 189 धावांचा आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. चेन्नईकडून मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. मोईन अलीने 36 तर तसेच सॅम करनने 34 धावांची खेळी केली. दिल्लीकडून आवेश खान आणि ख्रिस वोक्स या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
कर्णधार म्हणून रिषभ पंतचा पहिलाच सामना
युवा फलंदाज रिषभ पंतचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. या पहिल्याच सामन्यात रिषभची गाठ त्याचा गुरु महेंद्रसिंह धोनीसोबत आहे. त्यामुळे पंत कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
दिल्लीकडून 2 खेळाडूचं पदार्पण
दिल्लीने 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्कियाची उणीव भरुन काढण्यासाठी इंग्लंडच्या ख्रिस वोक्स आणि टॉम करन या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
चेन्नईचे अंतिम 11 शिलेदार
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फॅफ डु प्लेसीस, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन आणि मोईन अली.
युवा दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार), अमित मिश्रा, आवेश खान, मार्कस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, ख्रिस वोक्स, रवीचंद्रन अश्विन आणि टॉम करन.
संबंधित बातम्या :
(csk vs dc ipl 2021 delhi capitals amit mishra playing 100th match and ajinkya rahane playing 150th match against chennai super kings)