IPL 2020 | चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आयसोलेशनमध्येच, मुंबईविरुद्ध सामन्यात अनुपस्थितीची चिन्हं

IPL 2020 मध्ये 19 सप्टेंबरला अबूधाबीमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज खेळण्याची शक्यता कमी आहे.

IPL 2020 | चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आयसोलेशनमध्येच, मुंबईविरुद्ध सामन्यात अनुपस्थितीची चिन्हं
Follow us
| Updated on: Sep 17, 2020 | 12:05 PM

दुबई : चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अद्यापही आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या महिन्यात ऋतुराजला कोरोनाची लागण झाली होती. IPL 2020 मध्ये 19 सप्टेंबरला अबूधाबीमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज खेळण्याची शक्यता कमी आहे. (CSK’s Ruturaj Gaikwad remains in isolation unlikely for IPL opener against Mumbai Indians)

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले की, ऋतुराज गायकवाड ‘पूर्णपणे ठीक’ आहे, पण संघात सामील होण्यास अद्याप त्याला बीसीसीआयची मंजुरी मिळाली नाही.

“ऋतुराजला अद्याप बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे हिरवा कंदील मिळालेला नाही. तो आयसोलेशनमध्ये आहे. पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता नाही. आम्ही येत्या काही दिवसात तो पुनरागमन करण्याची अपेक्षा करत आहोत. त्याची प्रकृती चांगली आहे” असे विश्वनाथन यांनी सांगितले.

चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट संघासह सहाय्यक पथकातील 13 सदस्यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ऋतुराज गायकवाड आणि दीपक चहर हे खेळाडू होते. चहर आणि इतर 11 जणांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यावर त्यांनी पुन्हा प्रशिक्षण सुरु केले आहे.

ऋतुराज गायकवाडच्या रविवार व सोमवारी दोन चाचण्या झाल्या, त्यांचा निकाल अद्याप समजलेला नाही. 14 दिवसांच्या क्वारंटाईननंतर कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यावरही खेळाडू प्रशिक्षणास तंदुरुस्त असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कार्डिओवास्क्युलर आणि फुफ्फुसाची चाचणी घेणे बंधनकारक आहे. (CSK’s Ruturaj Gaikwad remains in isolation unlikely for IPL opener against Mumbai Indians)

स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत गायकवाडकडे संघाच्या नजरा टिकल्या होत्या. वैयक्तिक कारणांमुळे रैनाने स्पर्धेतून माघार घेतली आणि तो मायदेशी परतला. तर अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगनेही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | प्रेमाच्या पिचवर पृथ्वी शॉची विकेट, अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा

(CSK’s Ruturaj Gaikwad remains in isolation unlikely for IPL opener against Mumbai Indians)

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.