इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला, ‘हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार!’

इरफान पठाण याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आयपीएलच्या 14 व्या मोसमातील डेव्हिड वॉर्नरच्या खेळीवर टीका केली. (David Warner responsible For Bad performance Of sunrisers hyderabad Says Irfan Pathan)

इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला, 'हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार!'
इरफान पठाण आणि डेव्हिड वॉर्नर
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 7:17 AM

मुंबई :  आयपीएलचा 14 वा मोसम कोरोनाच्या मैदानातील एन्ट्रीमुळे तसंच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जरी स्थगित केला असला तरी स्पर्धेविषयी अजूनही चर्चा होत आहे. यंदाच्या मोसमात सनरायजर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. संपूर्ण टीम विजयासाठी संघर्ष करताना दिसली. संघाचा संघनायक डेव्हिड वॉर्नर (David Warner) त्याच्या फॉर्मशी झगडत होता. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे डेव्हिड वॉर्नरला टीकेला सामोरं जावं लागलं. प्रसंगी त्याच्याकडून संघाचं नेतृत्व काढून घेऊन केन विल्यमसनकडे (Kane Williamson) देण्यात आलं. या साऱ्या प्रकारानंतर अनेक दिग्गजांनी डेव्हिड वॉर्नरवर टीकेचा भडीमार केला. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) देखील हैदराबादच्या खराब खेळाला वॉर्नरलाच जबाबदार धरलं आहे. (David Warner responsible For Bad performance Of Sunrisers Hyderabad IPL 2021 Says Irfan Pathan)

इरफान पठाणची डेव्हिड वॉर्नरवर टीका

इरफान पठाण याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आयपीएलच्या 14 व्या मोसमातील डेव्हिड वॉर्नरच्या खेळीवर टीका केली. तो म्हणाला, “सनरायजर्स हैदराबादचं यंदाच्या वर्षी मला आश्चर्य वाटलं. हैदराबादचा संघ माझ्या चॉप 4 पैकी एक होता. सनरायजर्सच्या संघाची सगळ्यात प्रमुख समस्या ही त्यांची कॅप्टन्सी होती.वॉर्नर ज्याप्रकारे हैदराबादचं नेतृत्व करत होता किंवा बॅटिंग करत होता, त्यामुळे संघाला अडचणी आल्या.” पुढे बोलताना पठाण म्हणाला, “वॉर्नरने खराब नेतृत्व केल्यामुळेच केन विल्यमसनकडे संघाचं नेतृत्व दिलं गेलं. टीम मॅनेजमेंट वॉर्नरच्या कॅप्टन्सीवर समाधानी नव्हती किंबहुना नाराज होती”

हैदराबादची खराब कामगिरी

हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात खराब प्रदर्शन केलं. हैदराबादने स्पर्धा स्थगित होण्याअगोदर एकूण 7 सामने खेळले. त्यापैकी केवळ एका सामन्यात हैदराबादला विजय मिळवता आला. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 6 सामने खेळले गेले त्यापैकी एका सामन्यात संघाला विजय मिळवला. वॉर्नरच्या सततच्या अपयशामुळे संघाची धुरा केन विल्यमसनकडे देण्यात आली. यंदाच्या मोसमात सनरायजर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.

आयपीएला डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला, मिम्सला उधाण

डेव्हिड वॉर्नरची (Dawid Warner) सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हकाळपट्टी करण्यात झाली. त्यानंतर त्याच्या जागी केन विलियमसनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर वॉर्नरला पुढील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली नाही. वॉर्नर थेट वॉटरबॉय झालेला दिसून आला. वॉर्नरला वगळल्यामुळे त्याचा तळतळाट लागला आणि आयपीएल स्थगित करण्यात आली, अशा प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

(David Warner responsible For Bad performance Of sunrisers hyderabad IPL 2021 Says Irfan Pathan)

हे ही वाचा :

PHOTO | सौंदर्याची खाण, गायन, नृत्य ते मॉडेलिंग, सर्वच क्षेत्रात पारंगत, ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीची जगभरात ख्याती

Chinese rocket | चीनचे रॉकेट कोसळताना जोरदार धमाका, वॉर्नरने मालदीवमधून सांगितला थरारक अनुभव

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.