अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Delhi Capitals vs Royal Challengers Banglore) या दोन तुल्यबळ संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बँगलोरने दिल्लीवर अवघ्या एका धावेने निसटता विजय मिळवला आहे. बँगलोरने दिल्लीला 172 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दिल्लीला निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून शिमरन हेटमायरने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी करत या सामन्यातील दिल्लीचं आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत ठेवलं होतं. सोबत कर्णधार ऋषभ पंतने 58 धावांची संयमी खेळी केली. तर बँगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराज आणि काईल जेमिसनने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. 4 षटकात बँगलोरने 30 धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, एबी डिव्हिलियर्सने बँगलोरचा डाव सावरला. डिव्हिलियर्सच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर बँगलोरने दिल्लीसमोर 171 धावांचा डोंगर उभा केला आहे. दिल्लीकडून इशांत शर्मा, अमित मिश्रा, आवेश खान, कगिसो रबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अखेरच्या षटकात दिल्लीला 16 धावांची आवश्यकता होती. परंतु दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि शिमरन हेटमायरला केवळ 14 धावा करता आल्या. दिल्लीला बँगलोरकडून अवघ्या एका धावेने पराभूत व्हावं लागलं आहे.
शिमनरन हेटमायरने आयपीएल कारकीर्दीतलं दुसरं आणि यंदाच्या मोसमातलं पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने 23 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने 50 धावा केल्या आहेत.
17 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर शिमरन हेटमायरने उत्तूंग लगावला, हेटमायरने या षटकात तीन षटकार ठोकत दिल्लीचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं आहे. (दिल्ली 139/4)
17 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर शिमरन हेटमायरने 88 मीटर लांब षटकार लगावला (दिल्ली 139/4)
17 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शिमरन हेटमायरने 92 मीटर लांब षटकार लगावला (दिल्ली 133/4)
14 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शिमरन हेटमायरने 76 मीटर लाब षटकार लगावला (दिल्ली 108/4)
दिल्लीचा चौथा फलंदाज माघारी परतला, मार्कस स्टॉयनिस 22 धावांवर बाद, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एबी डिव्हिलियर्सने सोपा झेल घेत स्टॉयनिसला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
13 व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर हर्षल पटेलल्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने सलग दोन चौकार लगावले. (दिल्ली 89/3)
मोठ्या प्रतीक्षेनंतर ऋषभ पंतने गिअर बदलला आहे. पंतने 12 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टनन सुंदरच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावला. (दिल्ली 81/3)
बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर मार्क्स स्टॉयनिसने चौकार लगावला आहे. 12 व्या षटकातील 3 ऱ्या चेंडूवर वॉशिंग्टनन सुंदरच्या गोलंदाजीवर चौकार लगावला. (दिल्ली 77/3)
पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या संघाने 2 बाद 43 धावा जमवल्या आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ (20) आणि कर्णधार ऋषभ पंत (9) सावधपणे खेळत आहेत.
दिल्लीचा दुसरा फलंदाज माघारी परतला आहे. स्टीव्ह स्मिथ 4 धावांवर बाद, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एबी डिव्हिलियर्सने सोपा झेल घेत स्मिथला बाद केलं.
दिल्ली कॅपिटल्सने पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर शिखर धवन 6 धावांवर बाद. काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर युजवेंद्र चहलने सोपा झेल घेत धवनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (दिल्ली – 23/1)
दिल्लीच्या दोन षटकात 23 धावा, यामध्ये पृथ्वीच्या 13 तर धवनच्या 6 धावांचा समावेश
पहिल्या षटकात दिल्लीच्या सात धावा, यामध्ये शिखर धवनच्या एका चौकाराचा समावेश
दिल्लीच्या डावाला सुरुवात, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानावर, तर बंगळुरुकडून डेनियल सैम्सची पहिली ओव्हर
अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सने गगनचुंबी षटकार लगावला.
अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सने उत्तूंग षटकार लगावला.
अखेरच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्सने शानदार षटकार ठोकत बँगलोरला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे.
एबी डिव्हिलियर्सने कारकिर्दीतलं 40 वं अर्धशतक झळकावत बंगलोरला सुस्थितीन नेऊन ठेवलं आहे. 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून एबीडीने अर्धशतक पूर्ण केलं. (बँगलोर 148/5)
बँगलोरने पाचवी विकेट गमावली आहे. 17 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कगिसो रबाडाने वॉशिंग्टन सुंदरला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केल.
17 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सने 86 मीटरचा शानदार षटकार फटकावला.
बँगलोरचा चौथा फलंदाज माघारी परतला आहे. रजत पाटीदार 31 धावांवर बाद. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने शानदार कॅच पकडत पाटीदारला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (बँगलोर 114/4)
15 व्या षटकातील 3 ऱ्या चेंडूवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सने 79 मीटरचा शानदार षटकार फटकावला.
14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशांत शर्माच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारने 65 मीटरचा षटकार ठोकला. (बँगलोर 103/3)
11 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारने 87 मीटरचा षटकार ठोकला. (बँगलोर 78/3)
बँगलोरचा तिसरा फलंदाज बाद झाला आहे, अमित मिश्राच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल 25 धावांवर असताना स्टीव्ह स्मिथकडे सोपा झेल देत माघारी परतला. (8.3 षटकात 60.3)
आठव्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलने 88 मीटर लांब षटकार ठोकला. (दिल्ली 57/2)
सातव्या षटकात अमित मिश्राच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलने शानदार षटकार फटकावला. (दिल्ली 47/2)
बँगलोरने दुसरी विकेट गमावली आहे. देवदत्त पडिक्कल 17 धावांवर बाद, इशांत शर्माने पडिक्कलला त्रिफळाचित केलं.
बँगलोरच्या संघाला पहिला झटका बसला आहे. कर्णधार विराट कोहली 12 धावांवर बाद, आवेश खानने विराटला त्रिफळाचित केलं.
बँगलोरच्या सलामीवीरांना फटकेबाजी सुरु केली आहे. पहिल्या षटकात इशांत शर्माच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कलने एक चौकार वसूल केला. त्यानंतर दुसऱ्या षटकात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने कगिसो रबडाला दोन चौकार लगावले.
बँगलोरच्या डावाला सुरुवात झाली आहे, सलामीवीर विराट कोहली-देवदत्पत डिक्कल मैदानात उतरले आहेत.
नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Match 22. Delhi Capitals win the toss and elect to field https://t.co/DMSHuJvhGn #DCvRCB #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021
दिल्ली आणि बँगलोर हे दोन संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत 25 सामन्यांमध्ये भिडले आहेत. यापैकी 14 सामन्यांमध्ये बँगलोरने विजय मिळवला आहे, तर 10 सामने दिल्लीने जिंकले आहेत.
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सची अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (DC vs RCB) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.