Deepak Chahar wedding: भारतीय क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या त्यांच्या लग्न समारंभातील खास गोष्टी
आग्रा येथील क्रिकेटर दीपक चहरची होणारी बायको जया भारद्वाज मूळची बाराखंबा, दिल्लीची आहे. त्या दिल्लीतील एका टेलिकॉम कंपनीत डिजिटल कंटेंट हेड म्हणून काम करत आहेत. दीपक चहरने आयपीएलच्या एका लीग सामन्यादरम्यान जया भारद्वाज यांना प्रपोज केले होते.
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) आणि त्याची होणारी बायको जया भारद्वाज (Jaya Bhardwaj) आज विवाहबंधनात अडकणार आहेत. आग्राच्या (Agra) फतेहाबाद रोडवर असलेल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचे लग्न होणार आहे. मंगळवारी लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. संगीत कार्यक्रमात दीपक चहरने जयासोबत बॉलीवूड गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. दीपकने लाल रंगाचा कुर्ता-पायजामा घातला होता. तसेच जयाने ब्लू कॉर्प रंगाचा क्रॉपटॉप आणि लेहेंगा घातला होता. तासाभराहून अधिक काळ स्टेजवर दोघांनी जोरदार डान्स केला. आज हळदीचा सोहळा आहे. या विधीदरम्यान कुटुंबातील काही खास पाहुणे आणि दीपक यांच्या कुटुंबियांचा सहभाग असेल. दीपक चहरच्या लग्नाला अनेक बडे क्रिकेटर्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
10 पाहुणे देखील लग्नाची शोभा वाढवतील
आग्रा येथील क्रिकेटर दीपक चहरची होणारी बायको जया भारद्वाज मूळची बाराखंबा, दिल्लीची आहे. त्या दिल्लीतील एका टेलिकॉम कंपनीत डिजिटल कंटेंट हेड म्हणून काम करत आहेत. दीपक चहरने आयपीएलच्या एका लीग सामन्यादरम्यान जया भारद्वाज यांना प्रपोज केले होते. त्यांच्या या स्टाइलची खूप चर्चा देखील त्यावेळी झाली होती. लग्नसोहळ्यात दीपक चहर पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. यासाठी द रॉयल ग्रॅण्डर थीमवर तयारी करण्यात आली आहे. या थीमनुसार कुटुंबातील सर्व सदस्य कपडे घालतील. यासोबतच 10 पाहुणे देखील लग्नाची शोभा वाढवतील, जे फक्त दिव्यासारखे कपडे घालतील.
सकाळी 10 वाजता हळदी समारंभ होणार
मंगळवारी मेहंदी व संगीत सोहळा पार पडला. बुधवारी सकाळी 10 वाजता हळदी समारंभ होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. विधी दरम्यान, कुटुंबातील काही खास पाहुणे आणि दीपक चहर यांचा सहभाग असेल. यानंतर रात्री नऊ वाजता मिरवणुकीने दीपक चहर यांचे आगमन होईल अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पाहुण्यांसाठी वेगवेगळे पदार्थ
दीपक चहरच्या लग्नात पाहुण्यांसाठी वेगवेगळे पदार्थ असतील. त्यात थाई आणि इटालियन खाद्यपदार्थांसह ब्रज, अवधी, मुगलाई, पंजाबी, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ असतील. आग्रा येथील प्रसिद्ध चाट स्टॉलही असेल. शिवाय गोलगप्पा, दहीभल्ला, चाट पापडी, कुल्फी, पावभाजी असे पदार्थ असतील. मिठाईमध्ये हातरसची प्रसिद्ध राबडी असेल.