IPL 2021 : आर. अश्विनच्या आयपीएल सोडण्याच्या निर्णयावर कोच रिकी पाँटिंगचं ट्विट, म्हणाला…
दिल्लीच्या संघात दररोज कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होते. मला आशा आहे की सगळं काही ठीक होऊन अश्विन पुन्हा दिल्लीसाठी खेळताना दिसेल, अशी प्रतिक्रिया पाँटिंगने दिली आहे. (Delhi Capitals Coach Ricky Ponting Statement On R Ashwin Decision Leave IPL 2021)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारताचा फिरकीपटून आणि दिल्ली डेअरडेविल्सचा प्रमुख खेळाडू आर.अश्विन (R Ashwin) याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. यावरच दिल्लीचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक (DC Coach) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगची (Ricky Ponting) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘दिल्लीच्या संघात दररोज कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होते. मला आशा आहे की सगळं काही ठीक होऊन अश्विन पुन्हा दिल्लीसाठी खेळताना दिसेल, अशी प्रतिक्रिया पाँटिंगने दिली आहे. (Delhi Capitals Coach Ricky Ponting Statement On R Ashwin Decision Leave IPL 2021)
रिकी पाँटिंग काय म्हणाला…?
आयपीएलने सर्व संघासाठी जगातील सर्वात सुरक्षित बायो बबल तयार केला आहे. परंतु बायो बबलच्या बाहेरील कोरोनाच्या वातावरणासंबंधी दिल्लीच्या संघात दररोज चर्चा होत असते. भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव सगळ्यांना आहे. मी या सगळ्या परिस्थितीवर दिल्लीच्या खेळाडूंशी दररोज चर्चा करत आहे, असं रिकी पाँटिंगने सांगितलं.
अश्विनच्या निर्णयावर पाँटिंगचं मत काय?
दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर अश्विनने रविवारी रात्री ट्विट करुन आपण आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडत असल्याचं जाहीर केलं. माझे कुटुंबीय आणि आप्तेष्ठ कोरोनाशी दोन हात करत आहेत. सध्याच्या या कठीण परिस्थितीत मी त्यांच्यासोबत असणं मला गरजेचं वाटतं. म्हणून मी आयपीएल 2021 ही स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय, असं ट्विट अश्विनने केलं. त्याच्या या ट्विटवर रिकी पाँटिंगने त्याला रिप्लाय दिला.
सुरक्षित राहा, आपल्या परिवाराची काळजी घे… आशा करतो आपण लवकरच भेटूयात, असं ट्विट रिकी पाँटिंगने अश्विनला रिप्लाय देताना केलं. एकंदरितच अश्विनच्या स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाण्याच्या निर्णयावर पाँटिंगने एक प्रशिक्षक म्हणून संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Stay safe, look after your family and hopefully we will see you soon
— Ricky Ponting AO (@RickyPonting) April 26, 2021
आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाताना अश्विनने काय ट्विट केलंय?
आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय, “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन ”
आयपीएल स्पर्धेतून आतापर्यंत किती खेळाडुंनी माघार घेतली?
IPL 2021 स्पर्धेतून आतापर्यंत पाच खेळाडुंनी माघार घेतली आहे. यामध्ये आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे.
(Delhi Capitals Coach Ricky Ponting Statement On R Ashwin Decision Leave IPL 2021)
हे ही वाचा :
PBKS vs KKR IPL 2021 Match 21 Results: पराभवांची मालिका खंडित, कोलकात्याची पंजाबवर 5 विकेट्सने मात
ना मोठं नाव, ना मोठा सेलिब्रिटी, ऑस्ट्रेलियाच्या दिलदार क्रिकेटपटूकडून भारताला लाखोंचा ऑक्सिजन बहाल