IPL 2020 | दिल्लीला मोठा झटका, अमित मिश्रानंतर हा अनुभवी खेळाडू स्पर्धेला मुकणार
अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रानंतर आता दिल्लीच्या आणखी एका स्टार गोलंदाजाला दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकावे लागले आहे. | (Ishant Sharma Ruled Out IPL 2020)
दुबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या (IPL 2020) यंदाच्या मोसमात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दिल्ली एकाबाजूला विजय मिळवत आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या खेळाडूंना दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागत आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रानंतर आता दिल्लीचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीला हा मोठा झटका लागला आहे. (Ishant Sharma Ruled Out IPL 2020)
? ANNOUNCEMENT ?
An unfortunate oblique muscle tear rules @ImIshant out of #Dream11IPL.
? Read more here ? https://t.co/oMOJfQZwTr
Everyone at #DelhiCapitals wishes Ishant a speedy recovery.#YehHaiNayiDilli pic.twitter.com/T6oLQmXmrR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 12, 2020
इशांतच्या डाव्या बाजूच्या बरगडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे इंशातला यापुढील सामन्यात खेळता येणार नाही. इशांतला 7 ऑक्टोबरला नेट्समध्ये सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. इशांतच्या दुखापतीची माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हॅंडलवरुन देण्यात आली आहे. दरम्यान इंशातला पाठीला झालेल्या दुखापतीमुळे दिल्लीच्या सलामीच्या सामन्यातही खेळता आले नव्हते.
दिल्लीला दुखापतीचं ग्रहण
यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीपासूनच दिल्लीच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागंल आहे. पहिल्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या खांद्याला दुखापत झाली होती. अमित मिश्राच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातून बाहेर पडावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 3 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात अमित मिश्राने स्वत:च्या बोलिंगवर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मिश्राच्या उजव्या बोटाला दुखापत झाली. तसेच आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतलाही दुखापतीमुळे दिल्लीकडून पुढील 2 सामन्यात खेळता येणार नाही.
इशांतची आयपीएल कारकिर्द
इंशात शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 90 सामने खेळले आहेत. या 90 सामन्यात इंशातने 72 विकेट्स घेतले आहेत. 12 धावा देऊन 5 विकेट ही इंशातच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे.
दिल्लीची दमदार कामगिरी
दिल्लीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांपैकी दिल्लीने 5 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर शिखर धवन, पृथ्वी शॉ हे फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे दिल्लीला आयपीएल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीला मोठा फटका, ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर
(Ishant Sharma Ruled Out IPL 2020)