दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या (Royal Challengers Bangalore) सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा झटका लागला आहे. दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला (Amit Mishra) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. अमित मिश्राला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलच्या या मोसमाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. संघात अमित मिश्राच्या जागेवर अक्षर पटेलला (Axar Parel) संधी मिळण्याची शक्यता आहे. (Spinner Amit Mishra ruled out of IPL 2020 due to finger injury)
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 3 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात अमित मिश्राने स्वत:च्या बोलिंगवर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मिश्राच्या उजव्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे मिश्राला आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पुढील सामन्यांना मुकावे लागणार आहे. अमित मिश्रा दिल्लीचा अनुभवी गोलंदाज आहे. अडचणीच्या वेळेत त्याने निर्णायक भूमिका बजावली आहे. अमित मिश्राच्या अनुपस्थितीत दिल्लीला मोठा समस्येला सामोरं जावं लागणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंपैकी अमित मिश्रा एक खेळाडू आहे. अमित मिश्राने आयपीएलमध्ये 150 सामने खेळले आहेत. यात त्याने 160 विकेट्स घेतल्या आहेत. 17 धावा देऊन 5 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी राहिली आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 3 वेळा हॅट्रिक घेण्याची असाधारण कामगिरीही अमित मिश्राने केली आहे.
दरम्यान दिल्लीने यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीने खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान दिल्ली आज (5 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात दिल्लीचा विजय झाल्यास दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचेल.
संबंधित बातम्या :
(Spinner Amit Mishra ruled out of IPL 2020 due to finger injury)