श्वसनाचा त्रास झाला, तरीही धोनीने षटकार ठोकून सामना जिंकला!

अॅडिलेड : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीसोबत अर्धशतकी भागीदारी करुन भारताला अॅडिलेड वन डे जिंकून दिला. सहा विकेटने सामना जिंकत भारताने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने 49.2 षटकातच हा सामना जिंकला. धोनीने विराट कोहलीला साथ तर दिलीच, पण विजयी […]

श्वसनाचा त्रास झाला, तरीही धोनीने षटकार ठोकून सामना जिंकला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

अॅडिलेड : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीसोबत अर्धशतकी भागीदारी करुन भारताला अॅडिलेड वन डे जिंकून दिला. सहा विकेटने सामना जिंकत भारताने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने 49.2 षटकातच हा सामना जिंकला.

धोनीने विराट कोहलीला साथ तर दिलीच, पण विजयी समारोपही धोनीने स्वतःच्याच हाताने केला. फलंदाजी करताना धोनीला श्वसनाचा त्रासही झाला. अॅडिलेडमध्ये तापमान जास्त होतं. गरमी जास्त असल्यामुळे भारतीय फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागला.

धोनीला श्वसनाचा त्रास झाल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. धावा काढताना पळाल्यास फलंदाजांना प्रचंड त्रास होत होता. दोन धावा काढल्यानंतर धोनीलाही श्वसनाचा त्रास झाला आणि तो जागेवरच बसला. यानंतर तातडीने राखीव खेळाडू धोनीसाठी ड्रिंक घेऊन धावत आला. लिक्विड ड्रिंक दिल्यानंतर धोनीने पुन्हा फलंदाजी सुरु केली.

दिनेश कार्तिकने याबाबत पत्रकार परिषदेतही माहिती दिली. कार्तिक मिश्किलपणे म्हणाला की, “मी त्याला सिंगल, डबल आणि तीन धावा काढण्यासाठी मजबूर करत होतो, ज्यामुळे धोनीला जास्त त्रास झाला. कदाचित पुढच्या वेळी माझ्याऐवजी तो दुसऱ्याला पसंती देईल”

दरम्यान, पहिल्या वन डे सामन्यातही धोनीने अर्धशतकी खेळी केली होती. पण यासाठी त्याने 92 चेंडू खर्च केले, ज्यामुळे त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. अॅडिलेड वन डेतही धोनीने अर्धशतकी खेळी केली. पण यावेळी त्याने केवळ 53 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि भारताला विजय मिळवून दिला. बेस्ट फिनिशर असल्याचं धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिलं.

धोनीचं वय 37 वर्षे असलं तरीही तो भारतीय संघातील सध्याच्या वीशीतल्या खेळाडूंपेक्षाही जास्त फिट आहे. एकदा हार्दिक पंड्या आणि धोनीची धावण्याची शर्यत लागली होती. या शर्यतीत धोनीने तरुण तडफदार हार्दिक पंड्यालाही हरवलं होतं.

पाहा व्हिडीओ :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.